सटाणा पंचायत समितीत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:16 PM2018-11-20T23:16:30+5:302018-11-21T00:38:58+5:30
विकासकामांची अंमलबजावणी करताना अधिकारी व कर्मचारी वर्गाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच कामे करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांनी केले.
सटाणा : विकासकामांची अंमलबजावणी करताना अधिकारी व कर्मचारी वर्गाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच कामे करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांनी केले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच अधिकारी व ग्रामसेवक कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत उपाध्यक्ष गावित अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाकडून विकासकामे करताना सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या उपस्थितीत कामांचा शुभारंभ करूनच कामे सुरू करावीत कारण त्यांचा तो अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या. बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, कृषी, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण या सर्व विभागांचा स्वतंत्र आढावा घेऊन गावित यांनी योग्य सूचना केल्या. या सर्व विभागातील कामकाजाबाबत लोकप्रतिनिधींना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाºया बिरसा मुंडा कृषिक्र ांती विकास योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना यातील ब्राह्मणगाव गटातील लाभार्थींना विहीर मंजुरीचे प्रशासकीय आदेश प्रदान करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावरील ५ टक्के पेसा,१४ वा वित्ता आयोगांतर्गत कामे चांगल्या प्रतीचे करावीत, याकामी गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालावे तसेच बिजोरसे येथील ग्रामसेवक यांच्या बाबतच्या तक्र ारी त्वरित निकाली काढाव्यात, अशी सूचना गावित यांनी केली.
बैठकीत पंचायत समिती सभापती विमल सोनवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव,जिल्हा परिषद सदस्य लता बच्छाव, साधना गवळी, कान्हू गायकवाड, यशवंत पवार, पंचायत समिती सदस्य रामदास सूर्यवंशी, वसंत पवार, दिलीप अहिरे, संजय जोपळे, जिभाऊ कोर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. डी. गर्गे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, बांधकाम उपअभियंता सी. पी. खैरनार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिस खान, शाखा अभियंता अशोक शिंदे, खैरनार, चौरे, हिरे, विस्तार अधिकारी व्ही. पी. जाधव, रामकृष्ण खैरनार, कृषी अधिकारी हिरे, पवार, नेरकर, बालविकास प्रकल्प अधिकारी देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरराव उपस्थित होते. सहायक गटविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.