ऊस पिकांमधील हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण बाबत वाकद येथे आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 07:29 PM2019-06-13T19:29:40+5:302019-06-13T19:30:24+5:30
देवगाव : वाकद येथे ऊस पिकामधील हुमणी किडींचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीचे नियोजन कृषी सहाय्यक साठे आर एन यांनी केले.
देवगाव : वाकद येथे ऊस पिकामधील हुमणी किडींचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीचे नियोजन कृषी सहाय्यक साठे आर एन यांनी केले.
अवर्षण परिस्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या प्रमुख कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये मागील दहा बारा वर्षात ऊस पिकामध्ये हुमनी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हुमनी किडीचा नुकसानीचा प्रकार तसेच आर्थिक नुकसानाची संकेत पातळी, हुमणीचा जीवनक्र म याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी सोमवंशी डी एन यांनी केले. यामध्ये त्यांनी हुमणीचा जीवनक्र म अंडी, अळी, कोश भुंगेरा कशा पद्धतीने असतो हे समजावुन. हुमनी अळी कशा पद्धतीने नुकसान करते याबाबत मार्गदर्शन केले.
जैविक नियंत्रण रासायनिक नियंत्रण तसे केले पाहिजे, एकात्मिक नियंत्रण कसे करावे, जमिनीची मशागत, नांगरणी पीक फेरपालट, सापळा पीक याबद्दल सविस्तर अशी माहिती राहुल साठे यांनी दिली. या अळीचे नियंत्रण जर एकात्मिक कीड व्यवस्थापन तत्वाचा अवलंब सामुदायिक मोहीम राबवून केला तर हुमनी आटोक्यात येते, हुमणी नियंत्रणाचे उपाय योग्य वेळी योजने अत्यंत महत्त्वाचे आहे ही वेळ टाळल्यास नियंत्रण उपाय त्याचा हवा तसा परिणाम होत नाही त्यामुळे याचे नियोजन करताना सामुदायिक रीत्या करावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
कार्यक्र मास रमेश बडवर, संजय खैरनार, विठ्ठल बडवर, सूर्यकांत बडवर, गौतम बच्छाव, पांडुरंग बडवर, सतीश पाटील, सुभाष बडवर, धनंजय मोरे, राजेंद्र लिप्टे, बाबासाहेब बडवर, भाऊसाहेब बडवर, सुनील बडवर, रमेश पवार, माणिक बडवर, वैभव बडवर, कैलास वाळुंज, श्रीनिवास पाटील, संदीप बडवर, दीपक बच्छाव इत्यादी शेतकरी उपस्थित होते.