मानधन योजनेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:27 AM2019-03-02T02:27:46+5:302019-03-02T02:29:45+5:30
असंघटित कामगारांनी आयुष्यभर केलेल्या कामाची दखल घेताना त्याच्या कष्टाला योगदान मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत जिल्ह्णातील कामकाजाचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला.
नाशिक : असंघटित कामगारांनी आयुष्यभर केलेल्या कामाची दखल घेताना त्याच्या कष्टाला योगदान मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत जिल्ह्णातील कामकाजाचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना योजनेला गती देण्याबाबत मार्गदर्शन केले.
केंद्र शासनाने असंगठित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे. यामध्ये १८ ते ४० वर्षांच्या वयोगटातील असंगठित क्षेत्रातील, वीटभट्टी कामगार, घरगुती कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार, बिडी कामगार, हातमाग कामगार, चामडी कामगार, विविध आस्थापनांमधील असंघटित कर्मचारी आदींना योजनेचा लाभ घेता येणार आहे. एखाद्या असंघटित कामगाराने योजनेची सदस्यता घेतली असेल आणि ६० वर्षांपर्यंत नियमित योगदान दिले असेल तर त्याला किमान मासिक ३ हजार इतकी पेन्शन मिळणार आहे.
डॉ. नरेश गिते यांनी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी, गट शिक्षण आधिकारी, उपअभियंता, तालुका वैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच जिल्हास्तरावरील सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.