न्यायडोंगरीत शौचालय योजनेचा आढावा

By admin | Published: December 28, 2015 12:11 AM2015-12-28T00:11:58+5:302015-12-28T00:21:43+5:30

न्यायडोंगरीत शौचालय योजनेचा आढावा

Review of toilet courts in judicial | न्यायडोंगरीत शौचालय योजनेचा आढावा

न्यायडोंगरीत शौचालय योजनेचा आढावा

Next

न्यायडोंगरी : ज्या ग्राम पंचायत सदस्यांकडे शौचालय नाही त्यांची नावे डीजीटल फलकाद्वारे गावाचे दर्शनी भागात लावण्यात येतील असा निर्णय प्रशासनाने घेऊन ह्या संदर्भाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर बैठक घेणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक ग्रा. पं. सदस्यांचे धाबे दनानले
आहे.
परंतु काही महिन्या पूर्वी पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीचे नाम निर्देशन पत्र भरतांनाचा शौचालय असल्याचा दाखला जोडण्याचे बंधनकारक होते त्याशिवाय अर्ज वैध समजल्या जात नव्हता तेव्हा काही दिवसा पूर्वी शौचालयाचा दाखला जोडुन निवडुन आलेल्या सदस्यांकडे आज शौचालय नाही? असा जावई शोध प्रशासनास लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा ज्या ग्राम सेवकांनी निवडणुक काळात शौचालय असल्याचे खोटे दाखले दिलेले असतील त्यांचेही नावे डिजीटल फलकावर फोटोसह लाऊन पंचायत समिती कार्यालयाचे प्रवेश द्वारावर त्याबाबत यावे अशी मागणी न्यायडोंगरी गावातील सुज्ञ नागरिकांनी केलेली आहे.
तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकार यांनी आढावा बैठकीच्या माध्यमातुन शौध घेणाऱ्या उपक्रमाचे न्यायडोंगरी करांनी सगत करीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शौचालय नसलेल्या ग्रा. प. सदस्यांचा शोध धेऊन त्यांच्या नावेच फक्त फलक न लावता त्यांना अपात्र घोषित करावे व वेळोवेळी खोटे दाखले देणाऱ्या ग्रामसेवकांचाही शोध घेऊन त्यांची वेतनवाढ रोखण्याची कार्यवाहीही त्यांच्यावर करण्यात यावी अशी मागणी न्यायडोंगरीच्या ग्रामस्थानी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Review of toilet courts in judicial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.