जिल्ह्यातील अनलॉकचा आज आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:50+5:302021-06-04T04:12:50+5:30
येत्या १५ तारखेपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी दर शुक्रवारी अनलॉकच्या परिणामांचा आढावा घेण्याचे निर्देश शासनाने दिलेले ...
येत्या १५ तारखेपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी दर शुक्रवारी अनलॉकच्या परिणामांचा आढावा घेण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार शुक्रवारी या संदर्भातील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. या बैठकीत शिथिलता दिल्यानंतर शहरातील रुग्णसंख्या, पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेड्सबाबत चर्चा केली जाणार आहे.
--इन्फो--
अफवा आणि चर्चा
राज्यात अनलॉक करण्यासंदर्भात सायंकाळी अनेक अफवा पसरल्याने नागरिकांसह व्यापारी, उद्योजकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण पसरले होते. नाशिक जिल्हा संपूर्ण अनलॉक करण्याबाबतचे वृत्त सर्वत्र पसरल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला. राज्य परिवहन महामंडळाने तर लागलीच जिल्ह्यात बसेस सुरू करण्याबाबतचे वेळापत्रकही काढले. हाॅटेल्स आणि मद्यविक्रेत्यांच्याही अपेक्षा उंचावल्या होत्या. सायंकाळी शहरात सर्वत्र अफवांना उधाण आले होते. दरम्यान, अनलॉकसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ असे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे जाहीर केले.