शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विषयाला पुन्हा चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:17 PM2020-10-21T23:17:47+5:302020-10-22T00:26:19+5:30
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असतानाही पदव्युत्तर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिकमध्ये नसल्याने महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी या संदर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असतानाही पदव्युत्तर तसेच शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय नाशिकमध्ये नसल्याने महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी या संदर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन प्रस्तावासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच पदव्युत्तरच्या जागा असाव्यात अशी अनेक वर्षांची मागणी आहे. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर म्हणून नाशिकची ओळख असतानाही इतर जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभी राहिली आहेत. मात्र नाशिकमध्ये अजूनही याविषयाला चालना मिळू शकलेली नाही. नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्याची उत्तर महाराष्ट्राच्या जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हे महाविद्यालय आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारातच होणार आहे.
महाविद्यालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व विभागीय संदर्भीय सेवा रुग्णालय संलग्नित करणे आवश्?यक असून, वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात तीन वर्षांसाठी रुग्णालय करार करण्यात येईल याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा असे सांगून शासकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर असे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू केले जातील, असे भुजबळ यांनी सांगितले. या महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिका?्यांनी प्रशासकीय बाबी तत्काळ पूर्ण कराव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक तात्याराव लहाने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.