मुळक यांची सनद रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:14 AM2021-04-17T04:14:22+5:302021-04-17T04:14:22+5:30

नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणी डॉ.रवींद्र मुळक यांची महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडील सनद रद्द करण्यात यावी, अशी मागणी सहायक ...

Revoke the charter of Mulak | मुळक यांची सनद रद्द करा

मुळक यांची सनद रद्द करा

Next

नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणी डॉ.रवींद्र मुळक यांची महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडील सनद रद्द करण्यात यावी, अशी मागणी सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांनी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे कुलसचील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे या मागणीवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेमडेसिविर इंजक्शन मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांच्या हतबलतेचा काही व्यक्ती गैरफायदा घेत असून, अशाच एका प्रकरणात रेमडेसिविरसाठी २५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या डॉ.रवींद्र मुळक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टरची सनद रद्द करण्याची मागणी होत आहे. रवींद्र मुळक यांनी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेने मुंबई ४ फेब्रुवारी, २०१० रोजी नोंदणी केली आहे. त्याचे नोंदणी प्रमाणपत्र ५०,६५१ असून, डॉ.मुळक जुना आडगाव नाका येथील सद्गुरू रुग्णालयाचे संचालक आहे. तक्रारदार कोरोनाबाधित रुग्णासाठी रेमडेसिविरचा शोध घेत असताना, डॉ.मुळक यांनी तीन रेमडेसिवीर उपलब्ध असून, प्रत्येकी २५ हजार रुपयांना मिळेल, असे तक्रारदारास सांगितले. प्रत्यक्षात नाशिक शहरात रेमडेसिविरची किंमत बाराशे रुपये आहे. मात्र, शहरात तुटवडा असताना, डॉ.मुळक यांनी रेमडेसिविरचा काळाबाजार केल्याप्रकरणी तक्रारदाराने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. त्यानंतर, पंचवटी पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासनाचे सुरेश देशमुख यांनी तीन रेमडेसिविर विकताना त्यांना अटक केली होती. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने शक्रवार(दि.१६) एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, कोठडीची मुदत संपुष्टात आली असली, तरी डॉ.मुळक यांनी शासन आदेशाचे उल्लंघन केले असून, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडून प्राप्त झालेल्या नोंदणी प्रमाणपत्रातील तरतुदींचे उल्लंघन केल्याने, त्यांची सनद रद्द करण्यात यावी, असे प्रदीप जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Revoke the charter of Mulak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.