क्रांतिवीर नाईक यांना दिंडोरीत अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 01:03 AM2019-12-16T01:03:57+5:302019-12-16T01:04:12+5:30

दिंडोरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात क्र ांतिवीर वसंतराव नाईक यांच्या १०७व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. संजय सानप यांच्या हस्ते करण्यात आले.

Revolutionary Naik Greetes in Dindori | क्रांतिवीर नाईक यांना दिंडोरीत अभिवादन

क्रांतिवीर नाईक यांना दिंडोरीत अभिवादन

googlenewsNext

दिंडोरी : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात क्र ांतिवीर वसंतराव नाईक यांच्या १०७व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. संजय सानप यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रा, बाळासाहेब चकोर यांनी क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, क्रांतिवीर नाईक यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचा व स्वातंत्र्यानंतर शेतकरी, शेतमजूर ,कामगार,दीन-दुबळे आणि पीडित लोकांसाठी केलेल्या सामाजिक आदर्श आजच्या तरुण पिढीने लक्षात घेणे काळाची गरज आहे. सायमन कमिशन, मिठाचा सत्याग्रह, चलेजाव यासारख्या स्वतंत्र आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन नाईक यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर शेतकरी, शेतमजूर, कामगार सुखी झाला पाहिजे त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना
न्याय्य हक्क मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष केला व त्यांना न्याय मिळवून दिला असेही प्रा. चकोर यांनी सांगितले.

Web Title: Revolutionary Naik Greetes in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.