टाकेद परिसरात भात पिकावर माव्याचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 11:29 PM2019-11-09T23:29:28+5:302019-11-10T00:54:47+5:30
इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यात भात पिकावर मावा रोगाने आक्रमण केल्याने अडचणीत आणखी भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यात भात पिकावर मावा रोगाने आक्रमण केल्याने अडचणीत आणखी भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, सर्वच पिकांचे प्रशासनाने तत्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी इगतपुरी तालुका प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने इगतपुरी नायब तहसीलदार पाटील यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे पूर्ण बिल माफ करावे, त्वरित शेतकरी बांधवांना मदतीचा हात द्यावा, शेतकºयांच्या मुलांची शिक्षण फी माफ करावी, नुकसानग्रस्तांना एक महिन्याचे रेशन धान्य मोफत द्यावे आदी मागण्यांचा निवेदनात उल्लेख आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी, तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, शहराध्यक्ष सोपान परदेशी, संतोष मानकर, सुरेश शेलार, वासुदेव भगतआदी उपस्थित होते.
पिक पाण्याखाली
शेतकºयांची हाता-तोंडाशी आलेली भातशेती, सोयाबीन ही पिके झालेल्या पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने कर्ज घेऊन पिकवलेल्या शेतीवर पूर्णपणे पाणी फिरले आहे. अनेकांची सोंगणी करून ठेवलेला भातही पाण्याखाली गेला. तर जनावरांसाठीचा चाराही भिजल्याने जनावरांना काय खाऊ घालावे, या चिंतेत शेतकरी सापडला आहे.