मजुरा अभावी भाताचे पिक अजुनही शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 05:28 PM2019-11-25T17:28:16+5:302019-11-25T17:29:10+5:30

इगतपुरी : तालुक्यात भाताचे विक्र मी उत्पादन होते. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने भाताचे पीक चांगले आहे. परंतु भात पिकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे भाताचे पिक अजूनही शेतात आहे. शेतामध्ये मजूरांना चारशे रु पये रोज देऊनही मजूर मिळेनासे झाले आहेत.

Rice crops are still in the field due to lack of wages | मजुरा अभावी भाताचे पिक अजुनही शेतात

मजुरा अभावी भाताचे पिक अजुनही शेतात

Next
ठळक मुद्दे परतीच्या पाऊसाचे प्रमाण जास्त राहील्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

इगतपुरी : तालुक्यात भाताचे विक्र मी उत्पादन होते. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने भाताचे पीक चांगले आहे. परंतु भात पिकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे भाताचे पिक अजूनही शेतात आहे. शेतामध्ये मजूरांना चारशे रु पये रोज देऊनही मजूर मिळेनासे झाले आहेत.
शेतात काम करण्याची तयारी आजच्या तरु ण पिढीत दिसत नाही, असे दिसून येत आहे. अजूनही कवडदरा, साकूर, घोटी खुर्द परीसरात भाताचे पिक शेतात उभे आहे. य वर्षी परतीच्या पाऊसाचे प्रमाण जास्त राहील्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतात काम करायला मजूर मिळत नसल्याने शेतकरी चितांतूर आहे. त्यातच हवामानात मोठे बदल होताना दिसतात. दुपार नंतर उन्हाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. यामुळेही शेतात मजूरांचे काम करण्याचे प्रमाण कमी दिसून येते. काही शेतकऱ्यांनी मजूराअभावी यंत्राने भाताचे पिक काढले आहे.
 
Web Title: Rice crops are still in the field due to lack of wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.