वाढत्या रोगराईने भात शेती संकटात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 03:46 PM2020-10-03T15:46:10+5:302020-10-03T15:46:43+5:30
पेठ : एकीकडे मानव प्राण्यावर कोरोना सारख्या महामारीचे संकट गडद होत असताना आता आदिवासी भागातील भात व नागली या पिकालाही करपा सारख्या रोगाने ग्रासले असून प्रथमच पेठ तालुक्यात झालेल्या अल्प पावसाने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

खरीप हंगामाच्या प्रारंभी हुलकावणी दिलेल्या पावसाने नंतरच्या काळात सुरु वात केली असली तरी पावसाची वेळ आणी प्रमाण टळून गेल्याने लावणी केलेल्या भात व नागली पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने जवळपास ८० टक्के भात शेती नष्ट झाली आहे. यावर्षी पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पिक विमा घेतला असल्याने कृषी विभाग व विमा कंपन्यांनी शेत कर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पाणी टंचाईचे संकट ओढवणार
चालू वर्षी पेठ तालुक्यात अल्प प्रमाणात झालेल्या पावसा मुळे जानेवारी पासून पाणी टंचाईचे संकट ओढवणार असल्याचे चिन्हे दिसत असून तालुक्यातील प्रलंबीत जल सिंचन प्रकल्प मार्गी लागावेत अशी अपेक्षाही सामान्य जनते कडून केली जात आहे .
(फोटो ०३ पेठ १)
करपा रोगाने बाधीत भातशेती.