भात, नागली, वरई पिकांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 03:05 PM2019-11-04T15:05:36+5:302019-11-04T15:05:58+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागासह पेठ तालुक्यात परतीच्या पावसाने कापणीस आलेले व कापून ठेवलेल्या भात, नागली, वरई, उडीद, भुईमूग आदी पिकांची नासाडी केली आहे. यामुळे आदिवासी शेतकरी हतबल झाले आहेत. या पाशर््वभूमीवर आमदार नरहरी झिरवाळ यांच्या समवेत तहसीलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी भावसार व संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी नुकसानीची पहाणी करून तत्काळ पंचनामे सुरू केले.

दिंडोरी व पेठ तालुक्यास परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले असून बळीराजा हवाल्दिल झाला आहे. शासन स्तरावर पंचनामे करण्यात येत असले तरी तुटपुंजी नुकसान भरपाई न देता उत्पादन खर्चाच्या तुलनेत आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे, पंचायत समिती सदस्य हिरामण महाले, सुरेश भोये, सुरेश पवार, जनार्दन गांगोडे, मंडळ अधिकारी व्ही. वाय. खोटरे, तलाठी एस. व्ही. केंगे आदींनी नुुकसानग्रस्त भागातील पहाणी दौरा करून पंचनामे केले.
चौकट-दिंडोरी व पेठ तालूक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, नुकसानग्रस्त भागातील पंचनामे शासन स्तरावर करण्यात येत. वनप्लॉट धारकांचे देखील नुकसानची पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली असल्याचे आमदार झिरवाळ यांनी सांगितले.