भातशेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:05 PM2019-08-03T23:05:41+5:302019-08-03T23:07:07+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वत्र शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक पुलांवरून वाहतूक थांबविण्यात आली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सतर्कत राहण्यास सांगण्यात आले आहे.

Rice paddy under water | भातशेती पाण्याखाली

भाताच्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शेतांना नद्यांचे स्वरूप आले आहे.

Next
ठळक मुद्देइगतपुरीत संततधार। धरणे ओव्हरफ्लो; पर्यटकांना धरण क्षेत्रात जाण्यास मज्जाव

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वत्र शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक पुलांवरून वाहतूक थांबविण्यात आली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सतर्कत राहण्यास सांगण्यात आले आहे.
भाताच्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शेतांना नद्यांचे स्वरूप आले आहे. भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी गोंदे दुमालाचे सरपंच गणपत जाधव यांनी केली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलिसांना सूक्ष्म लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील घटनांवर लक्ष ठेवले जात आहे.
तालुक्यात १२ तासांत २२१ मिमी पाऊस पडला असून, संततधार सुरूच आहे. आतापर्यंत पडलेल्या ३०५२ मिमी पावसाने नद्या-नाले, धरणे भरली आहेत. शनिवारअखेर ९१.७९ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. कोणत्याही क्षणी इगतपुरी तालुक्यात पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.
अनेक रस्त्यांवरील पुलांवर
पाणी आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक आणि पर्यटकांची वाहने पोलिसांकडून वळविण्यात आली आहे. पावसाने झोडपून काढल्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी
साचून राहिले आहे. काही
ठिकाणी झाडे पडल्याचे समजते. अतिपावसामुळे रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.अपर वैतरणा ओव्हरफ्लो
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अपर वैतरणा धरण शनिवारी ओव्हरफ्लो झाले. धरणाचे पाचही दरवाजे तीन फुटाने उघडण्यात आले असून, ९२०० क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईकरांना अपर वैतरणा धरण भरल्यामुळे दिलासा मिळाला असून, मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.पाणी वाहत असल्यास वाहने पाण्यात घालू नये. पर्यटकांना वाहत्या पाणी परिसरात बंदी करण्यात आली आहे. विजेच्या खांबांना आणि उपकरणांना स्पर्श करू नये. धुक्यात वाहनांचे लाइट आणि इंडिकेटर सुरू करावे. आपत्कालीन प्रसंगासाठी तालुका प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाची मदत घ्यावी.
- वंदना खरमाळे-मांडगे,
तहसीलदार, इगतपुरी

Web Title: Rice paddy under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस