समृद्धीबाधितांनी लावले काळे आकाशकंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:32 AM2017-10-19T00:32:30+5:302017-10-19T00:32:42+5:30
निषेध : काळी दिवाळी असल्याची भावना सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील समृध्दी बाधित शेतकºयांनी घरावर काळे आकाशकंदील लावून शासनाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धीबाधित शेतकºयांसाठी ही काळी दिवाळी असल्याची भावना व्यक्त केली आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे, सोनांबे, डुबेरे, सोनारी येथील शेतकºयांनी घरावर काळे आकाशकंदील लावण्यास प्रारंभ केला आहे.
निषेध : काळी दिवाळी असल्याची भावना
सिन्नर : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील समृध्दी बाधित शेतकºयांनी घरावर काळे आकाशकंदील लावून शासनाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.
समृद्धीबाधित शेतकºयांसाठी ही काळी दिवाळी असल्याची भावना व्यक्त केली आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे, सोनांबे, डुबेरे, सोनारी येथील शेतकºयांनी घरावर काळे आकाशकंदील लावण्यास प्रारंभ केला आहे.
‘समृद्धी महामार्ग रद्द करा’ अशा घोषणा लिहिलेल्या टोप्याही शेतकºयांनी परिधान केल्या आहेत.
समृद्धी महामार्गविरोधी शेतकरी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी घराबाहेर काळे आकाशकंदील लावण्याचा निर्णय घेतला होता.
कोणत्याही स्थितीत बागायती जमिनी देण्यास विरोध असल्याचे यावेळी शेतकºयांनी सांगितले. समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्याची मागणी केली जात आहे. आधीच अल्पभूधारक त्यात अनेकजण भूमिहीन होणार असल्याने शेतकºयांचा विरोध आहे.