लाखाची रोकड चोरणाऱ्या महिलेस बारा तासांत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:58 AM2018-10-30T00:58:32+5:302018-10-30T00:58:52+5:30
बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या महिलेची सुमारे एक लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास कानडे मारुती लेन परिसरात घडली होती़ भद्रकाली पोलिसांनी अवघ्या बारा तासांत रोकड चोरणाºया संशयित विमल मीनानाथ साळवे (५५, रा. खडकाळी, भद्रकाली) या महिलेचा शोध घेऊन अटक केली आहे़
नाशिक : बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या महिलेची सुमारे एक लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास कानडे मारुती लेन परिसरात घडली होती़ भद्रकाली पोलिसांनी अवघ्या बारा तासांत रोकड चोरणाºया संशयित विमल मीनानाथ साळवे (५५, रा. खडकाळी, भद्रकाली) या महिलेचा शोध घेऊन अटक केली आहे़ मखमलाबादरोडवरील जाणता राजा कॉलनीतील रहिवासी रेखा श्रावण ठोसरे (५५) या भाजीपाल्याचा व्यापार करतात़ रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी त्या बाजारपेठेत आल्या होत्या़ सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास त्या कानडे लेन परिसरातील शोभा स्टेशनरीसमोर ठोसरे या खरेदी करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या कापडी पिशवीत ठेवलेली ९५ हजार ९५० रुपयांची रोकड चोरून नेली़ ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाणे गाठून रोकड चोरीची फि र्याद दिली होती़
पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी, उपनिरीक्षक विशाल मुळे, पोलीस कर्मचारी सुधीर पाटील, कैलास शिंदे, संतोष उशीर, इरफान शेख यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयित महिलेचा शोध घेऊन अटक केली़ या महिलेने रोकड चोरीची कबुली दिली असून, चोरी केलेले ९६ हजार रुपये पोलिसांच्या सुपूर्द केले आहेत़