टेम्पोच्या धडकेत रिक्षाचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:56 PM2018-09-09T23:56:57+5:302018-09-10T00:19:44+5:30

भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पानाच्या दुकानाबाहेर उभा असलेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॅनडा कॉर्नरजवळील शरणपूर - त्र्यंबक लिंकरोड परिसरात घडली. बापू नामदेव उशिरे (४०, रा.कुमावतनगर, मखमलाबादरोड) असे अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

Rickshaw driver killed in tempo | टेम्पोच्या धडकेत रिक्षाचालक ठार

टेम्पोच्या धडकेत रिक्षाचालक ठार

Next

नाशिक : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पानाच्या दुकानाबाहेर उभा असलेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॅनडा कॉर्नरजवळील शरणपूर - त्र्यंबक लिंकरोड परिसरात घडली. बापू नामदेव उशिरे (४०, रा.कुमावतनगर, मखमलाबादरोड) असे अपघातातमृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
रिक्षाचालक बापू उशिरे हे रात्री १० वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन कॅनडा कॉर्नर परिसरात गेले होते़ प्रवासी सोडल्यानंतर त्यांनी आपली रिक्षा पॅनासॉनिक शोरूमजवळील पार्क केली व जवळील पानस्टॉलवर उभे होते़ यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या पिवळ्या रंगाच्या मिनी टेम्पोने (एमएच १५ एफ ३२१०) उशिरे यांना जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या उशिरे यांचा मृत्यू झाला़, तर घटनेनंतर टेम्पोचालक फरार झाला़

Web Title: Rickshaw driver killed in tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.