नाशकात रिक्षाचालकाचा खून : मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:08 AM2017-12-28T00:08:19+5:302017-12-28T00:14:07+5:30

सिडको : परिसरातील महालक्ष्मीनगर येथे रिक्षाचालकाचा खून झाल्याची घटना बुधवारी (दि. २७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. साहेबराव निंबा जाधव (३१) असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षाचालकांच्या आपसी वादातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ 

Rickshaw driver's murder: Rejecting the bodies of the dead | नाशकात रिक्षाचालकाचा खून : मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

नाशकात रिक्षाचालकाचा खून : मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

googlenewsNext
ठळक मुद्दे रिक्षाचालकाचा खूनरिक्षाचालकांच्या आपसी वादातून घटना घडल्याचा अंदाज

सिडको : परिसरातील महालक्ष्मीनगर येथे रिक्षाचालकाचा खून झाल्याची घटना बुधवारी (दि. २७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. साहेबराव निंबा जाधव (३१) असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षाचालकांच्या आपसी वादातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़  दरम्यान, हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले़ महालक्ष्मीनगरमध्ये रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून लाकडी दंडुका व धारधार शस्त्राने जाधव याच्यावर हल्ला केला. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाल्याने जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी जाधव यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाºयांनी तपासून मयत घोषीत केले़
जिल्हा रुग्णालयात जमलेल्या मयत जाधवच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेहाचा पंचनामा न करण्याची भूमिका घेतली़ यावेळी झालेल्या गोंधळामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. साहेबराव जाधवच्या भावाने संशयित दर्शन दोंदे, गणेश शेंडके व त्याच्या साथीदारांनी खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच गत तीन-चार महिन्यांपासून संशयित फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे सांगितले.
जिल्हा रुग्णालयात जाधवच्या नातेवाईकांना सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे व वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते़ अंबड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून उर्वरीत सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाल्याचे गोरे यांनी सांगितल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील तणाव निवळला़ दरम्यान, मयत जाधवच्या पश्चात आई, पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे़
 

Web Title: Rickshaw driver's murder: Rejecting the bodies of the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा