रिक्षावाल्या काकांकडून मुलांना पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:03 AM2019-04-11T00:03:31+5:302019-04-11T00:04:05+5:30
नाशिकरोड : वर्षभर शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षा-व्हॅनचालक काकांशी बच्चेकंपनी व विद्यार्थ्यांची वेगळी नाळ जुळलेली असते. परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर रिक्षा, व्हॅनचालक काका बच्चेकंपनीला ठिकठिकाणी पार्टी देताना दिसत आहे.
सुट्टी लागल्याने वर्षभर विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षा-व्हॅनचालक काकांकडून देण्यात आलेल्या पार्टीत सहभागी झालेले बच्चेकंपनी.
नाशिकरोड : वर्षभर शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षा-व्हॅनचालक काकांशी बच्चेकंपनी व विद्यार्थ्यांची वेगळी नाळ जुळलेली असते. परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर रिक्षा, व्हॅनचालक काका बच्चेकंपनीला ठिकठिकाणी पार्टी देताना दिसत आहे.
खासगी इंग्रजी शाळा, इंटरनॅशनल स्कूल यांच्या शाळांच्या वेळा पूर्वीच्या शाळांच्या वेळेपेक्षा वेगळ्या आहेत. शाळा, शिकवणी, विशेष क्लासेस, स्पोर्ट्स व घरचा अभ्यास यामुळे बच्चेकंपनीपासून मोठ्या विद्यार्थ्यांचे शालेय जीवन अत्यंत व्यस्त झाले आहे. तसेच शिक्षणाला आलेले महत्त्व, शाळांचे वाढलेले प्रस्थ यामुळे पालकवर्ग आपल्या पाल्याला लांब अंतरावरील शाळेत टाकण्यास कचरत नाही. वेगवान जीवन शैलीमुळे पाल्याला शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी काळाच्या ओघात रिक्षा-व्हॅनचालक काकांकडे गेली आहे. बच्चे कंपनी, विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ने-आण करणाºया रिक्षा-व्हॅनचालक काकांचे एक स्रेहाचे नाते निर्माणझाले आहे.
वर्षभर विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ने-आण करणाºया रिक्षा-व्हॅनचालक काका देखील परीक्षा संपल्यानंतर महिना-दीड महिना उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेणार आहे. परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्याने विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागत आहे. त्यामुळे परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्यानंतर वर्षभर विद्यार्थ्यांची ने-आण करणाºया रिक्षा-व्हॅनचालक काकांकडून बच्चे कंपनी विद्यार्थ्यांना उद्यान, समाजमंदिर, ओळखीची मोकळी जागा आदि ठिकाणी छोटी पार्टी दिली जात आहे. परीक्षा संपुन सुट्टी लागल्याने काही दिवसांकरिता अभ्यासाचा ताण मिटल्याने बच्चेकंपनी मोठ्या आनंदात आहे.आवडीचे नियोजन परीक्षा संपल्यानंतर पार्टी देताना काकांकडून बच्चेकंपनीच्या आवडीचे नियोजन केले जात आहे. पावभाजी, पाववडा, भजी, बटाटावडा, भेळभत्ता, वेफर्स, बर्फी, सरबत, उसाचा रस, आइस्क्रीम, बर्फाचा गोळा आदी खाद्यपदार्थांची पार्टी दिली जात आहे. त्याबरोबर चॉकलेट, कॅटबरी, फुगेदेखील दिले जात असून सुट्टीनंतर परत घ्यायला येतो, असे म्हणत काका विद्यार्थ्यांचा निरोप घेत-देत आहे.