शहरात विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 01:09 AM2020-08-21T01:09:01+5:302020-08-21T01:09:47+5:30
रिक्षा-टॅक्सीचालक-मालक यांना दहा हजार रुपयांची रोख मदत करा, कर्ज घेऊन रिक्षा घेतलेल्या रिक्षाचालकांना कर्जावरील व्याज माफ करा यासह विविध मागण्यांसाठी सिटू संलग्न नाशिक जिल्हा रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सातपूर : रिक्षा-टॅक्सीचालक-मालक यांना दहा हजार रुपयांची रोख मदत करा, कर्ज घेऊन रिक्षा घेतलेल्या रिक्षाचालकांना कर्जावरील व्याज माफ करा यासह विविध मागण्यांसाठी सिटू संलग्न नाशिक जिल्हा रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हे आंदोलन विजय नगर, संजीवनगर, नाशिकरोड, राणे नगर, सातपूर, अशोक नगर, कार्बननाका, कामगारनगर, आयटीआय
सिग्नल, त्रिमूर्ती चौक, माऊली लॉन्स आदींसह विविध ठिकाणी
आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
या शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सिताराम ठोंबरे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, संजय पवार, संतोष काकडे, देव्ीादास आडोळे, तुकाराम सोनजे, गौतम कोंगळे, सोमनाथ खैरे, साहेबराव घुमरे, रामनाथ पवार आदींचा समावेश होता.
सिटू कामगार भवन खुटवड नगर ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत रिक्षा टॅक्सी यांचा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र पोलिस प्रशासनाने पूर्वी दिलेल्या परवानगीला अचानक स्थागती दिली.त्यामुळे रिक्षा टॅक्सीचालक यांनी आपापल्या रिक्षा स्टॉप वर मागण्यांचे फलक घेऊन आंदोलन केले.