गणपती घाटात दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:21 PM2017-09-03T23:21:22+5:302017-09-03T23:21:47+5:30

सप्तशृंग गडावर रविवारी सकाळी ७.३० सुमारास गणपती घाटात दरड कोसळली. पुणे येथील भाविक दर्शन करून परतत असताना त्यांच्या सियाज गाडीवर ही दरड कोसळली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

The rift in the Ganpati Ghat collapsed | गणपती घाटात दरड कोसळली

गणपती घाटात दरड कोसळली

googlenewsNext

वणी : सप्तशृंग गडावर रविवारी सकाळी ७.३० सुमारास गणपती घाटात दरड कोसळली. पुणे येथील भाविक दर्शन करून परतत असताना त्यांच्या सियाज गाडीवर ही दरड कोसळली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मंदिरापासून पाच कीलोमीटर अंतरावर घडलेल्या घटनेची माहिती मिळताच न्यास व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके घटनास्थळी पोहचले. त्यांनी सदर वाहनातील भाविकांना सुरक्षित ठिकाणी पोहचिवले. गडावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. भाविकांना कोणतीही इजा झाली नसून गाङीतील दोन भाविक पुणे येथील असल्याची माहिती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत कळविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. विलास लक्ष्मण नानगाड़े यांच्या मालकीचे सदर वाहन असून एमएच१२एनजे ५९३४ असा या कारचा क्र मांक आहे.

Web Title: The rift in the Ganpati Ghat collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.