वणी घाटात दरड कोसळली

By admin | Published: September 18, 2015 10:40 PM2015-09-18T22:40:49+5:302015-09-18T22:44:51+5:30

वणी घाटात दरड कोसळली

The rift in the Wani Ghat collapsed | वणी घाटात दरड कोसळली

वणी घाटात दरड कोसळली

Next

वणी : गुरुवारी मध्यरात्रीपासून वणी आणि परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून, यामुळे पहाटेच्या सुमारास सप्तशृंगगडावरील गणपती घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. परिणामी येथील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.
मध्यरात्री दीडनंतर सुरू झालेल्या पावसाचा जोर आधी कमी होता मात्र नंतर वाढला. वणी, मुळाणे, बाबापूर, धरमबरडा, भातोडे, संगमनेर, कृष्णगाव, ओझरखेड, मावडी, तिसगाव, तळेगाव, खेडगाव, अंबानेर, पुणेगाव, पांडाणे, हस्ते माळे, कोशिंबे, करंजखेड येथे जोरदार पाऊस झाला. नद्या, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहु लागले. संगमनेर नदीला पूर आला असून, हे पाणी तिसगाव धरणात जात असल्याने धरणसाठ्यात तसेच ओझरखेड, पुणेगाव, करंजवण, पालखेड, एकलहरा तालुक्यातील धरणाच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे. भातोडे गावच्या देवनदीला पूर आल्याने या गावचा संपर्क तुटला तर गडावर रात्रभर सुरू असलेला वादळी पाऊस आणि धुके यामुळे नांदुरी ते गड १० किलोमीटरच्या अंतरात काही दिसेनासे झाले होते. एसटीमधून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्याही कमी होती.काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठयावर परिणाम झाला होता. काही कालावधीसाठी तरवणी शहराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे पाऊस गणपतीच्या सोंडेत अडकला असून पुढील नऊ दिवस पावसाची हजेरी राहिल असे भाकित जाणकारांकडुन वर्तविण्यात आले आहे.(वार्ताहर)

Web Title: The rift in the Wani Ghat collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.