नगरसेवकांच्या अधिकाराचाही अभ्यास होणे अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:32+5:302021-01-18T04:13:32+5:30

सातपूर :- नगरसेवकांनी कायद्यातील त्रुटी अभ्यासपूर्वक दूर करत आपले कौशल्य पणाला लावावे. प्रभागाचे कामकाज करताना नगरसेवकांना असलेले ...

The rights of corporators are also expected to be studied | नगरसेवकांच्या अधिकाराचाही अभ्यास होणे अपेक्षित

नगरसेवकांच्या अधिकाराचाही अभ्यास होणे अपेक्षित

Next

सातपूर :- नगरसेवकांनी कायद्यातील त्रुटी अभ्यासपूर्वक दूर करत आपले कौशल्य पणाला लावावे. प्रभागाचे कामकाज करताना नगरसेवकांना असलेले अधिकार समजण्यासाठी सक्षम भूमिका मांडण्याची गरज आहे. कौशल्यपूर्वक अभ्यासातून आपल्या प्रभागाचा विकास प्रामाणिकपणे साधल्यास विकास कामांना कोणतीही अडचण येणार नाही, असे प्रतिपादन नगरसेवक परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गुजर पाटील यांनी केले.

मुंबई नगरसेवक परिषदेचा नाशिक विभागीय मेळावा रविवारी (दि.१७) सातपूर येथे पार पडला. यावेळी अध्यक्षपदावरुन गुजर बोलत होते. व्यासपीठावर परिषदेचे कार्याध्यक्ष संजू वाडे, राज्य कमिटी सदस्य अभय शेळके, प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटील, राज्य उपाध्यक्ष व आयोजक दिनकर पाटील, जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड, नाशिक सरचिटणीस सलीम शेख, पुरुषोत्तम लोहगावकर, भूषण कासलीवाल, महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा आव्हाड, अपर्णा धात्रक आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटील यांनी परिषदेचे ध्येयधोरणे कार्यपद्धती समजावून सांगितली. वकील, डॉक्टर, आयपीएस, आयएएस अधिकारी यांच्या संघटना ज्याप्रकारे काम करतात त्याच धर्तीवर परिषदेचे कामकाज चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार, खासदारांना पेन्शन लागू होऊ शकते तर नगरसेवकांना का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांच्या मानधनात वाढ करून पेन्शन योजना लागू करण्यासाठी परिषदेने काम करावे, अशी मागणी परिषदेचे सरचिटणीस तथा नगरसेवक सलीम शेख यांनी यावेळी केली. जात, धर्म, पक्षविरहित संघटना स्थापन करीत राज्यातील नगरसेवकांना एकत्र आणण्याचे काम परिषद करीत आहे. नगरसेवकांच्या न्याय्य हक्कासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी संघटना मोठी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी पक्षभेद बाजूला सारत एकत्र येण्याचे आवाहन राज्य उपाध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. यावेळी नाशिकसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो :- नगरसेवक परिषद मेळाव्याचे दीप प्रज्वलन करताना परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गुजर पाटील समवेत दिनकर पाटील, सलीम शेख, संजू वाडे, अभय शेळके, कैलास गोरे पाटील, सुनील गायकवाड, पुरुषोत्तम लोहगावकर, भूषण कासलीवाल, पुष्पा आव्हाड आदी.

(१७नगरसेवक परिषद)

Web Title: The rights of corporators are also expected to be studied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.