मौजे नाशिक येथे हक्क चौकशीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:06+5:302021-01-08T04:42:06+5:30

पत्रकात नमूद केल्यानुसार माहे जानेवारी २०२१ पासून मौजे नाशिक येथील सर्व्हे नंबर ८६८, ८६९, ८७०, ८७१ व ८७४ मधील ...

Rights inquiry work started at Mauje Nashik | मौजे नाशिक येथे हक्क चौकशीचे काम सुरू

मौजे नाशिक येथे हक्क चौकशीचे काम सुरू

Next

पत्रकात नमूद केल्यानुसार माहे जानेवारी २०२१ पासून मौजे नाशिक येथील सर्व्हे नंबर ८६८, ८६९, ८७०, ८७१ व ८७४ मधील सर्व मिळकतींचे हक्क चौकशी काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाची ‘अ’ नोटीस प्राप्त झाली असल्यास मिळकतधारक यांनी त्यांचे हक्क सिद्ध करणारे पुरावे विशेष उपअधीक्षक भूमिअभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा) क्रमांक-१ नाशिक महानगरपालिका पश्चिम विभागीय कार्यालय इमारत, नवीन पंडित कॉलनी, शरणपूर रोड या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून संबंधितांना आपल्या मिळकतीचा नकाशा व हक्काची अचूक नोंद झाल्याची खातरजमा करण्यात येईल व मिळकतीची योग्य नोंद होऊन निश्चित होईल, असेही देवरे यांनी कळविले आहे.

Web Title: Rights inquiry work started at Mauje Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.