दिवसभर रिमझिम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:01 AM2020-07-07T00:01:04+5:302020-07-07T01:27:05+5:30
नाशिक : शहर व परिसरासह रविवारी (दि.५) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री दोन वाजेपासून पहाटेपर्यंत शहरासह धरणक्षेत्रांतदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी (दि.६) सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.३ मिमी इतका पाऊस शहरात मोजला गेला, तर मागील २४ तासांत १८ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली.
शहरात बरसलेल्या पावसाने शरणपूर रस्त्यावर वाहनधारकांची तारांबळ उडाली.
नाशिक : शहर व परिसरासह रविवारी (दि.५) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री दोन वाजेपासून पहाटेपर्यंत शहरासह धरणक्षेत्रांतदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी (दि.६) सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.३ मिमी इतका पाऊस शहरात मोजला गेला, तर मागील २४ तासांत १८ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली.
सोमवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान कायम होते. दिवसभर नाशिककरांना अवघे काही मिनिटेच सूर्यदर्शन घडले. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव कायम राहिला. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही पावसाची रिपरिप नागरिकांनी अनुभवली. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले. तसेच रविवारी मध्यरात्रीपासूनच शहरात वाऱ्याचा वेग नेहमीपेक्षा अधिक वाढल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागला आहे. वारे वेगाने वाहू लागल्याने दिवसभर आकाशात ढगांची गर्दी अन् हलक्या सरींची हजेरी सुरू राहिली.
मुंबईच्या समुद्रकिनाºयावर वाºयाचा वेग वाढला असून, दोन दिवसांपासून पाऊसही जोरदार सुरू आहे. यामुळे शहराच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्र मे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला.
गंगापूर धरण समूहात झालेला पाऊस असा
गंगापूर धरण समूहातदेखील पावसाने मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार हजेरी लावली. गंगापूर-४० मिमी, अंबोली-४५ मिमी, कश्यपी-१५ मिमी, गौतमी-२९ मिमी इतका पाऊस पाणलोट क्षेत्रात मोजण्यात आला. यामुळे गंगापूर धरणात नव्याने ५१ दलघफू पाऊसपाण्याची आवक झाली.