देवमामलेदारांच्या यात्रोत्सवात सटाण्यात रंगली कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 05:36 PM2019-12-29T17:36:33+5:302019-12-29T17:38:49+5:30

सटाणा : येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगली राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगीरांमुळे कुस्ती शौकिनांच्या डोळयांचे पारणे फेडणारी ठरली.

Riot wrestling riots in Devmamledar yatra | देवमामलेदारांच्या यात्रोत्सवात सटाण्यात रंगली कुस्त्यांची दंगल

देवमामलेदारांच्या यात्रोत्सवात सटाण्यात रंगली कुस्त्यांची दंगल

googlenewsNext
ठळक मुद्देपरराज्यातून कुस्तीपटू दाखल झाले होते.

सटाणा : येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (दि.२८) आरम नदीपात्रात भरविण्यात आलेली विराट कुस्ती दंगली राज्य व परराज्यातून आलेल्या नामांकित कुस्तीगीरांमुळे कुस्ती शौकिनांच्या डोळयांचे पारणे फेडणारी ठरली.
यंदा राज्य व परराज्यातील महिला व युवती मल्लांनी स्वयंस्फूर्तीने कुस्ती दंगलीत सहभाग घेतल्याने ही दंगल चांगलीच रंगली. हे या दंगलीचे प्रमुख आकर्षण ठरले. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्यातर्फे लावण्यात आलेल्या छोटू खांडेकर (साक्र ी) व सोनू दळवी (चाळीसगाव) यांच्यातील चांदीचे कडे आणि पाच हजार रूपयांच्या अत्यंत चुरशीचा व उत्कंठावर्धक झालेला अंतिम सामना सायंकाळी सात वाजेपर्यंत रंगला. अखेर सामना बरोबरीत सुटल्याने खांडेकर व दळवी या कुस्तीपटूंना पारितोषिक विभागून देण्यात आले.
येथील देवमामलेदार मंदिराच्या मागील बाजूकडील आरम नदीपात्रात देवमामलेदारांच्या यात्रोत्सवानिमित्त आज शनिवारी कुस्ती दंगलींचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन वाजता आमदार दिलीप बोरसे, उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड,देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन करून व नारळ वाढवून कुस्ती दंगलीला प्रारंभ झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून देवस्थानचे उपाध्यक्ष रमेश सोनवणे, विश्वस्त रमेश देवरे, हेमंत सोनवणे, सुनील खैरनार, लालचंद सोनवणे, शरद शेवाळे, दीपक पाकळे, मुन्ना शेख, छोटू सोनवणे, बिंदु शर्मा, साहेबराव सोनवणे, जीवन सोनवणे आदी उपस्थित होते.
कुस्ती दंगलीसाठी राज्य व परराज्यातील शंभरहून अधिक कुस्तीगिरांनी सहभाग नोंदविला. लहान वयोगटातील कुस्तीगीरांच्या कुस्तीपासून सुरु वात झाली. देवस्थानतर्फे नारळ व रोख रक्कम या विजयी कुस्तीपटूना देण्यात आली. शंभर रु पयांपासून ते अकरा हजार रु पयांपर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या.
मानाच्या कुस्त्यांसाठी दोन हजार रु पये ते पाच हजार रु पयांची पारितोषिके ठेवण्यात आली होती. सटाणा पोलीस ठाणे व काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही रोखीच्या बिक्षसांच्या कुस्त्या लावल्या. या कुस्ती दंगलींमध्ये राज्यातील नाशिक, औरंगाबाद, येवला,मालेगाव, मनमाड, धुळे, नंदुरबार, चोपडा, पारोळा,नगर, जळगाव, नवापुर, पिंपळनेर आदींसह परराज्यातून कुस्तीपटू दाखल झाले होते.
कुस्ती दंगली पाहण्यासाठी पंचक्र ोशीतील हजारो कुस्तीशौकीनांनी गर्दी केली होती. कुस्ती दंगलीच्या इतिहासात देवस्थानने आता दंगलीत युवतींचा सहभाग वाढविला आहे. या युवतींच्या कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती.
पंच म्हणून यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष अनिल पाकळे, सचिन सोनवणे, शिवाजी पाकळे, दिलीप शिवरकर, नूरा शेख, शिवाजी जाधव आदींनी काम पाहिले. निलेश पाकळे, ललित सोनवणे, हवालदार नवनाथ पवार, पुंडलिक डंबाळे आदींसह कुस्ती शौकीन बहुसंख्येने उपस्थित होते. दीपक नंदाळे यांनी सूत्रसंचालन केले.

@अवघ्या पाच वर्षांच्या हिरकणी खैरनार आणि सायली खैरनार या चिमुकलींचा रंगलेला कुस्तीचा सामना आजचे प्रमुख आकर्षण ठरला. यामध्ये हिरकणी खैरनार हिने विजय मिळविला. प्रज्ञा बिरवच्छे (इगतपुरी) हिने शुभेच्छा जाधव (लासलगाव), सर्वज्ञा पवार (मालेगाव) हिने अरु णा डंबाळे (पुणेगाव), प्रियांका मंडाले (चांदवड) हिने पूजा पवार (कंधाने) तर पल्लवी हेबांडे (पिंपळगाव) हिने साक्षी आहेर (देवळा) हिला चारीमुंड्या चित करीत विजय मिळविला.
 

Web Title: Riot wrestling riots in Devmamledar yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.