सत्तेच्या राजकारणापर्यंत रिपाइंची मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:12 AM2019-10-01T01:12:59+5:302019-10-01T01:13:18+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पक्षाला स्थापनेपासूनच बंडखोरी आणि फुटीचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली,

 Ripi's floor to the politics of power | सत्तेच्या राजकारणापर्यंत रिपाइंची मजल

सत्तेच्या राजकारणापर्यंत रिपाइंची मजल

Next

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पक्षाला स्थापनेपासूनच बंडखोरी आणि फुटीचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली, परंतु पक्षाला मूर्तस्वरूप येण्यापूर्वीच त्यांचे निर्वाण झाले. त्यानंतर ३ आॅक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. स्थापनेनंतर वर्षभरातच हा पक्ष फुटला आणि फाटाफुटीची बीजे तेव्हापासूच रुजली.
१९४२मध्ये स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युलकास्ट फेडरेशन पक्षाने १९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. १९५२च्या निवडणुकीत मात्र १२ खासदार लोकसभेत निवडून गेले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे रूपांतर पुढे रिपब्लिकन पक्षात झाले. मात्र अल्पावधीतच रिपब्लिकन पक्षातील फूट पडली आणि ती कायमच राहिली. १९५८ मध्ये फुटलेला रिपब्लिकन पक्ष पुढे १९६४ आणि १९६५ मध्ये सातत्याने फुटत गेला. जवळपास ३२ गटांमध्ये हा पक्ष विखुरला गेला आहे.
सत्तेतील सहभागासाठी रिपाइंच्या एकीकरणासाठी समाजाने पुढाकार घेतला आणि जनतेच्या रेट्यामुळे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आणि रा. सू. गवई हे सारे नेते एकत्र आले. १९९८मध्ये झालेल्या एकीकरणाच्या प्रयोगामुळे चौघेही लोकसभेत निवडून गेले. मात्र या दलित नेत्यांची वैचारिक भूमिका आणि राजकीय महत्त्वाकांक्षा भिन्न असल्यामुळे प्रत्येकाने आपला मार्ग निवडला. त्यामुळे मधल्या काळातील ऐक्य अल्पायुषीच ठरत गेले. रिपाइं नेत्यांची वैयक्तिक भूमिका सातत्याने समोर आली असली तरी भिन्न पक्ष तसेच स्वपक्षाच्या माध्यमातून या नेत्यांनी रिपब्लिकनचा दबदबा कायम ठेवला. या पक्षामागे त्या नेत्याचे नाव जोडले गेले असले तरी सत्ता संपादनाच्या केंद्रस्थानी हे नेते कायम राहिले.
विदर्भात कवाडे यांचे अस्तित्व आणि विद्यमान आमदार, आठवले हे केंद्रात मंत्री तर प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी आले आहेत. जिल्ह्यात आणि राज्यात या नेत्यांची ताकद कमी-अधिक प्रमाणात कायम असून त्याची दखल प्रत्येक सत्ताधाऱ्याला घ्यावीच लागली आहे.
वंचितच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांचे राज्यातील महत्त्व वाढले आहे. तर केंद्रात मंत्री असलेल्या आठवले यांचे नाशिक जिल्ह्यात मोठे प्राबल्य आहे. १७२ उपसरपंच, १८५ सरपंच, २७ नगरसेवक, मनमाडचे नगराध्यक्षपद, इगतपुरीचे उपनगराध्यक्ष, कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्षपद, नाशिक मनपात गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने रिपाइंचा उमेदवार आहे. आठवले आणि आंबेडकर यांनी आपल्या गटाचे उमेदवार विधानसभेत उतरवून अस्तित्व कायम ठेवले आहे.

Web Title:  Ripi's floor to the politics of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.