सिंधी भाषेतून संस्कारक्षम पिढीचा उदय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:30 AM2017-11-26T00:30:27+5:302017-11-26T00:32:08+5:30
समाजाचा सर्वांगीण विकास व संस्कारक्षम भावी पिढी घडविण्यासाठी सिंधी भाषेमधून पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सिंधी भाषेक डे समाजाचे काहीसे दुर्लक्ष होत असून, सिंधी संस्कृतीपासून भावी पिढी दुरावणार नाही, यासाठी समाजाने जागरूकता दाखवावी, असा सूर सिंधी भाषा विकास राष्ट्रीय परिषदेच्या महिला परिसंवादात उमटला.
नाशिक : समाजाचा सर्वांगीण विकास व संस्कारक्षम भावी पिढी घडविण्यासाठी सिंधी भाषेमधून पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सिंधी भाषेक डे समाजाचे काहीसे दुर्लक्ष होत असून, सिंधी संस्कृतीपासून भावी पिढी दुरावणार नाही, यासाठी समाजाने जागरूकता दाखवावी, असा सूर सिंधी भाषा विकास राष्ट्रीय परिषदेच्या महिला परिसंवादात उमटला. राष्टÑीय सिंधी भाषा विकास परिषद व नाशिक जिल्हा सिंधी पंचायत फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय सिंधी भाषा विकास राष्टÑीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी (दि.२५) तपोवन रिंगरोडवरील सिंधी पंचायतीचे रामीबाई भवन सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी ‘सिंधी भाषेच्या विकासात समाजाचे योगदान’ या विषयावर पार पडलेल्या महिलांच्या परिसंवादातून सदर सूर उमटला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेचे समन्वयक अजित मन्याल, सिंधी पंचायत फेडरेशनचे अध्यक्ष शीतलदास बालाणी, अर्जुन कटपाल, राजेश बोधवाणी, किशन अडवाणी, शंकर जयसिंघाणी, अशोक लोकवाणी, मनोहर कारडा, दीपाचंद्राणी, दीपिका कलाणीदेवी आदी मान्यवर उपस्थित होते. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करणाºया ज्येष्ठांचा सन्मान करून परिषदेला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, राष्टÑीय परिषदेचा प्रारंभ समाजाचे जे मुख्य आधारवड आहे ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक. वयाची ८० वर्षे पूर्ण करणाºया ज्येष्ठांचा सन्मान करून सिंधी भाषा विकास परिषदेला प्रारंभ करण्यात आल्याची घोषणा मन्याल यांनी यावेळी बोलताना केली. नाशिक हे धार्मिक तीर्थक्षेत्र असून, या पुण्यभूमीत समाजाच्या ज्येष्ठांचा सन्मान करण्याची मिळालेली संधी हा सुवर्णयोग असल्याचे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक दीपा चांगराणी यांनी केले.
आज रंगणार ‘...शान-ऐं-सुरहाण’
रविवारी सकाळी दहा वाजता रामीबाई भवन येथे खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात सिंधीबांधव सहभागी होऊन ‘सिंधी भाषेच्या विकासासाठी समाजाचे योगदान’ या विषयावर आपले मत मांडू शकतात. तसेच संध्याकाळी पाच वाजता भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात १०० मुले ‘...शान -ऐं- सुरहाण’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती फेडरेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
‘सिंधी भाषेच्या विकासामध्ये समाजाचे योगदान’ या विषयावर नाशिकरोड, देवळाली आदी उपनगरांमधील सिंधी सखी मंचच्या सदस्य असलेल्या महिलांनी आपले विचार मांडले. समाजात प्रथमच सिंधी संस्कृतीच्या जोपासणेसाठी पूरक अशा राष्टÑीय परिषद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ही समाजाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. - हेमा ज्ञानचंदाणी
सिंधी समाजाच्या विकासासाठी विविध समाजसुधारक ांनी योगदान दिले असून, त्यांचे योगदान समाजाने विसरून चालणार नाही. आज भावीपिढीला सिंधी भाषेमधून संस्कृ ती व संस्काराचे धडे पालकांनी देण्याची गरज आहे.
- लता टहलियानी