मालेगावी वाढती गुन्हेगारी : रशीद शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 11:10 PM2021-08-16T23:10:12+5:302021-08-16T23:10:56+5:30
मालेगाव : शहरात खून, लूटमार, चोऱ्यामाऱ्या, गावठी कट्टे, तलवारी आढळून येत आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात असल्याचा आरोप माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मालेगाव : शहरात खून, लूटमार, चोऱ्यामाऱ्या, गावठी कट्टे, तलवारी आढळून येत आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात असल्याचा आरोप माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
शेख म्हणाले की, शहरात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत आहे. तलवारी, गावठी कट्टे आढळून येत आहेत. प्रशासन संजय गांधी योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. नागरिकांची कामे रखडली आहेत. शहरात कुत्ता गोळी, गांजा, चरसचे सर्रास विक्री केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होत आहे. शहरातील काही राजकीय लोकांकडून गुन्हेगारांना आश्रय दिला जात आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन लेखी तक्रार करणार असल्याचेही माजी आमदार शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे गटनेते असलम अन्सारी, जाकीर शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.