गॅसच्या वाढत्या किमतीमुळे महिलांच्या डोक्यावर पुन्हा आली सरपणाची मोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 08:50 PM2022-05-15T20:50:06+5:302022-05-15T20:50:40+5:30
सायखेडा : हजारी पार केलेल्या गॅसने आपली जागा बदलली असून गॅस अडगळीच्या खोलीत गेला तर गॅसची जागा पुन्हा एकदा चुलीने घेतली आहे त्यासाठी लागणाऱ्या सरपणाची मोळी पुन्हा एकदा महिलांच्या डोक्यावर दिसू लागल्याने आपण २० वर्ष मागे गेल्याची अनुभूती येऊ लागली आहे.
सायखेडा : हजारी पार केलेल्या गॅसने आपली जागा बदलली असून गॅस अडगळीच्या खोलीत गेला तर गॅसची जागा पुन्हा एकदा चुलीने घेतली आहे त्यासाठी लागणाऱ्या सरपणाची मोळी पुन्हा एकदा महिलांच्या डोक्यावर दिसू लागल्याने आपण २० वर्ष मागे गेल्याची अनुभूती येऊ लागली आहे.
ग्रामीण भागात दररोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातून गॅसवरील स्वयंपाक हद्दपार होत आहे.
रेशन धान्य दुकानातून २०१४ पासून केरोसिन मिळणे बंद झाल्यानंतर देशातील अनुसूचित जातीसह अन्य विविध घटकांमधील सर्वसामान्य महिलांसाठी ह्यउज्ज्वलाह्ण योजना आली. त्याअंतर्गत सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत. दरमहा त्यांना एक गॅस सिलिंडर मिळते. सुरुवातीला दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी आता एक ते पाच रुपयांवर आली. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानंतरही सबसिडी वाढलेली नाही. त्यामुळे जवळपास सव्वासात लाख ह्यउज्ज्वलाह्ण पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत.
हातावरील पोट असलेल्या महिलांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेतून दररोज रोजगार शोधावा लागतो. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये डोळ्याचे विकार वाढले. त्यामुळे केंद्र सरकारने त्या महिलांना वर्षात१२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सबसिडी अधिक मिळत असल्याने कनेक्शनची संख्या भरमसाट वाढली. मात्र, सबसिडी टप्प्याटप्याने कमी करण्यात आली. तीनशे रुपयांपर्यंत मिळणारी सबसिडी मागील काही वर्षांत अवघ्या पाच रुपयांपर्यंत खाली आली. त्यामुळे पुन्हा सरपणाची ह्यचूलह्णच बरी असा सूर त्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांमधून निघू लागला. सध्या गॅस सिलिंडरचा दर १००० रुपयेपर्यंत झाला आहे. हातावरील पोट असलेल्यांना तेवढी रक्कम देऊन सिलिंडर खरेदी करणे परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. दुसरीकडे डिझेल, पेट्रोल दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
दिवसाला दोनशे रुपये रोज मिळतो, त्यात उन्हाळा कडक असल्यामुळे हाताला काम मिळत नाही, त्यामुळे पैसे येणे बंद झाले आहे. अशा परिस्थितीत १ हजार ३० रुपये खर्च करणे सामान्य कुटुंबाला परवडत नसल्याने शेताच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या फांद्या गोळा करून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
- सुनीता कमानकर, गृहिणी, भेंडाळी.