कोरोनो रु ग्णांची वाढती संख्या आमदारांनी घेतली आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 08:56 PM2020-10-05T20:56:28+5:302020-10-06T01:07:00+5:30

इगतपुरी : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनो रु ग्णांची संख्या वाढत असल्याने जनजागृती करण्यासाठी शहरातील प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या वार्डात फीरून जनजागृती करावी तर तालुक्यातील प्रत्येक गांवातील सरपंच व उपसरपंच यांनी गावात जनजागृती करणे आवश्यक आहे.

Rising number of Corona patients MLAs review meeting | कोरोनो रु ग्णांची वाढती संख्या आमदारांनी घेतली आढावा बैठक

तहसील कार्यालयात आढावा बैठकीत आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, गटविकास अधिकारी लता गायकवाड आदी.

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनजागृतीचे काम करणे आवश्यक

इगतपुरी : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनो रु ग्णांची संख्या वाढत असल्याने जनजागृती करण्यासाठी शहरातील प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या वार्डात फीरून जनजागृती करावी तर तालुक्यातील प्रत्येक गांवातील सरपंच व उपसरपंच यांनी गावात जनजागृती करणे आवश्यक आहे. या बरोबर शिक्षकांनी देखील कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनजागृतीचे काम करणे आवश्यक असुन यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व मुख्याघिकारी यांनी तसे आदेशच काढावे अशा सुचना आमदार हिरामण खोसकर यांनी तहसीलदार कार्यालयातील आढावा बैठकीत दिल्या. तसेच आज पर्यंत कोरोना वाढू नये यासाठी तालुक्यातील अधिकारी यांनी काय उपाय योजना केल्या माहीती आमदार खोसकर यांनी जाणुन घेतल्या. यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे, पंचायत समिती सभापती जया कचरे, तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख, ग्रामीण रु ग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, शहराध्यक्ष विसम सैयद, गोकुळ थेटे, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, गौरव राऊत, अमोल बोरावके आदी उपस्थित होते.
 

Web Title: Rising number of Corona patients MLAs review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.