आकस्मिक किडनी विकाराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:20 AM2017-08-12T00:20:06+5:302017-08-12T00:20:11+5:30
आॅर्गन ट्रान्सप्लांट करताना आकस्मिकपणे किडनीचे कार्य बंद झाले तर रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण तीन पटीने अधिक वाढते, यासाठी कोणती दक्षता घेता येऊ शकते आणि काय पूर्वतयारी करता येऊ शकेल याबाबतचे संशोधन नाशिकचे डॉक्टर चारुहास ठकार यांनी अमेरिकेत केले आहे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी आॅफ सिसिनाटीमध्ये संशोधकांच्या चमूने ‘अक्युट किडनी फेल्युअर’ या विषयावर दहा वर्षे संशोधन करून काही निष्कर्ष काढले आहेत.
नाशिक : आॅर्गन ट्रान्सप्लांट करताना आकस्मिकपणे किडनीचे कार्य बंद झाले तर रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण तीन पटीने अधिक वाढते, यासाठी कोणती दक्षता घेता येऊ शकते आणि काय पूर्वतयारी करता येऊ शकेल याबाबतचे संशोधन नाशिकचे डॉक्टर चारुहास ठकार यांनी अमेरिकेत केले आहे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी आॅफ सिसिनाटीमध्ये संशोधकांच्या चमूने ‘अक्युट किडनी फेल्युअर’ या विषयावर दहा वर्षे संशोधन करून काही निष्कर्ष काढले आहेत. नाशिकचे डॉ. चारुहास ठकार नेतृत्वाखालील चमूने केलेल्या संशोधनात ‘किडनी फेल्युअर’ विषयावर अनेक उपाय मांडण्यात आले आहेत. चमूतील तीन डॉक्टर्स भारतीय असून, डॉ. ठकार हे त्यातील एक आहेत. अवयव प्रत्यारोपण करताना रुग्णाची किडनी (मूत्रपिंड) बंद पडण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी उपचाराच्या क्रमाची फेरमांडणी आणि उपाय या संशोधनात मांडले आहेत. डॉक्टर चारुहास ठकार हे अमेरिकेत नेफ्रॉलॉजिस्ट (किडनी विकारतज्ज्ञ)
म्हणून परिचित असून, गेल्या २८ जुलै रोजी त्यांचे अवयव प्रत्यारोपण आणि किडनीची काळजी’ या विषयावरील संशोधन विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्यांनी सुचविलेले उपाय हे ‘चारुहास ठकार प्रोटोकॉल’ म्हणून मान्य झाले आहे. अवयव प्रत्यारोपण विशेषत: हृदय आणि यकृत प्रत्यारोपण करताना आकस्मिक रुग्णाची किडनी फेल झाली, तर रुग्ण दगावण्याचा धोका तीन पटीने वाढतो. मूळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बाजूला राहते आणि किडनीने काम बंद केल्यामुळे शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होतो आणि रुग्ण चिंताजनक अवस्थेत जातो. सिनसिनाटी विद्यापीठात याबाबतचे संशोधन सुरू करण्यात आले होते. यामध्ये डॉ. ठकार यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. अवयवप्रत्यारोपण करताना किडनी फेल्युअर होऊ नये म्हणून डॉ. ठकार यांनी काही प्रोटॉकॉल मांडले आहेत. अवयवप्रत्यारोपण करताना विशिष्ट प्रकारचे ड्रग्ज आणि काळजीच्या काही मेथड मांडल्या आहेत. अवयव प्रत्यारोपणापूर्वीच किडनीची काळजी, त्याबाबतची पद्धत, औषधोपचार आणि उपाय याबाबतचे संशोधन मांडण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधात्मक औषधे आणि मॉडिफाइड औषधे सुचविली आहेत. गेल्या दहा वर्षांत १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा अभ्यास करून ‘अक्युट किडनी फेल्युअर’ संशोधन करण्यात आले आहे. युनिव्हर्सिटीच्या हेल्थ न्यूजमध्ये हे संशोधन जाहीर करण्यात आले असून ‘अमेरिकन सोसायटी आॅफ नेफरॉलॉजी’ संघटनेनेही त्यांचे हे संशोधन प्रकाशित केले आहे. या संघटनेने जगभर पंधरा हजार किडनीविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. चारुहास ठकार हे नाशिकचे असून, एम.डी. मेडिसिन डॉ. विनय ठकार यांचे चिरंजीव आहेत. गेल्या वीस वर्षांपासून डॉ. चारुहास अमेरिकेत असून, त्यांनी आत्तापर्यंत अनेक संशोधन केले आहे. अमेरिकेच्या सिसिनाटी विद्यापीठात ते मूत्रपिंडशास्त्र विषय शिकवितात.
चारूहास ठकार प्रोटोकॉल
या संशोधनात डॉ. ठकार यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. अवयवप्रत्यारोपण करताना किडनी फेल्युअर होऊ नये म्हणून डॉ. ठकार यांनी काही प्रोटॉकॉल मांडले आहेत. विशिष्ट प्रकारचे ड्रग्ज आणि काळजीच्या काही मेथड मांडल्या आहेत. या मेथडला ‘डॉ. चारूहास ठकार प्रोटोकॉल’ असे विशेषण देण्यात आले आहे.