उडड्या गटारींमुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 03:27 PM2020-01-15T15:27:03+5:302020-01-15T15:27:40+5:30

सुरगाणा - येथील पाच नंबर वार्ड मधील गटारींचे उघडे असलेले चेंबर ढापे टाकून झाकण्याची वेळोवेळी संबंधितांकडे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने खेळणाऱ्या लहान मुलांसाठी हे चेंबर धोकादायक ठरले आहेत.

  Risk due to flying thunderstorms | उडड्या गटारींमुळे धोका

उडड्या गटारींमुळे धोका

Next
ठळक मुद्दे पाच नंबर वार्ड मधील रस्त्याचे कॉंक्रि टीकरण पावसाळ्याआधी करण्यात आले. मात्र काही ठिकाणी भूमीगत गटारींंचे चेंबर अद्यापही उघडेच असून गल्लीत खेळणार्या लहान मुलांसाठी धोकादायक ठरले आहेत. तर काही ठिकाणी थोडा थोडा भाग कॉंक्रि टविना सोडून देण्यात आला आहे. एक म

खेळताना या उघड्या चेंबरमध्ये पडून दूर्घटना होण्याची भिती व्यक्त होत आहे. या चेंबरसह अन्य चेंबरवर ढापे टाकून गटार झाकण्याची मागणी संबंधित ठेकेदाराकडे गेल्या सात आठ महिन्यांपासून केली जात असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही ठिकाणी चेंबर लहान आणि वरु न टाकण्यात येणारी जाळी मोठी झाली असल्याने वरचेवर जाळी ठेवण्यात आली आहे. सदर रस्त्याची पहाणी करण्यासाठी दोन वेळा वरिष्ठ अधिकारी देखील येऊन गेले. या अर्धवट कामांकडे त्यांचे देखील दूर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. संबंधित ठेकेदाराकडे व त्यांच्या सहकारींकडे देखील चेंबरवर जाळी टाकण्याबाबत वेळोवेळी सांगण्यात आले. . याबाबत मुख्याधिकारी माने यांना देखील सांगण्यात आले. मात्र त्यांनीही सांगतो बघतो यापलीकडे काही केले नाही. लहान मुले खेळत असल्याने उघड्या चेंबरवर त्विरत जाळी टाकून गटार झाकण्याची मागणी केली जात आहे 

 

Web Title:   Risk due to flying thunderstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.