घाटनदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 04:15 PM2018-10-15T16:15:12+5:302018-10-15T16:15:38+5:30

नवरात्रोत्सव : दोन दिवसात लाखभर भाविकांची हजेरी

Ritual of devotees to visit Ghatan Dev | घाटनदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ

घाटनदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ

googlenewsNext
ठळक मुद्देइगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत व नवसाला पावणारी घाटनदेवी मातेच्या दर्शनासाठी पहाटे चार वाजेपासून महाआरतीसाठी रीघ लागत आहे

इगतपुरी : तालुक्याचे ग्रामदैवत आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणाऱ्या शैलपुत्री घाटनदेवी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात रिघ लागली असून नाशिक जिल्ह्यासह नगर, जालना, बीड, धुळे, कसारा, जव्हार, मोखाडा, कल्याण, ठाणे, पुणे, अहमदनगर,संगमनेर, मुंबईसह विविध भागातून भाविक दाखल झाले आहेत.
सोमवारी (दि.१५) सहावी व मंगळवारी सातवी माळ असल्याने भाविक नवसपूर्तीसाठी  दाखल झाल्याने घाटनदेवीचा परिसर भाविकांनी फुलुन गेला आहे. सलग दोन दिवसात सुमारे लाखभर भाविकांनी उपस्थिती लावल्याने मुंबई-आग्रा महामार्ग देवी भक्तांमुळे फुलला होता तर देवी मातेच्या जय घोषाने समस्त परिसर दुमदुमून गेला होता. इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत व नवसाला पावणारी घाटनदेवी मातेच्या दर्शनासाठी पहाटे चार वाजेपासून महाआरतीसाठी रीघ लागत आहे. विशेष म्हणजे भाविक दर्शनासाठी चार ते पाच किलोमीटर चालत येत येऊन दर्शन घेतात तर घाटनदेवी मातेचा परिसर खेळणी, पूजेचे साहित्य, प्रसादाचे साहित्य, हॉटेल अशा विविध दुकानांनी परिसर फुलून गेला आहे. सर्वाधिक गर्दीचा महामार्ग म्हणूनओळख असणा-या मुंबई आग्रा महामार्गा लगतच घाटनदेवीचे मंदिर असल्याने येथे प्रत्येक जाणारा येणारा भाविक थांबल्या शिवाय राहत नाही. तसेच येथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्याबरोबरच ऐतिहासिक उंटदरी, रेल्वेचे बोगदे,ऐतिहासिक पुल,वनविभागाने नव्याने बांधलेले निसर्ग माहिती केंद्र , उद्यान हे सुद्धा आकर्षण ठरत आहे.

Web Title: Ritual of devotees to visit Ghatan Dev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक