नायगाव खोऱ्यातील नदी-नाले प्रवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:06 PM2019-08-04T23:06:03+5:302019-08-04T23:14:02+5:30

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे नायगाव खोºयातील सर्व नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. नायगाव- सायखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शेतात पाणी साचल्याने हजारो एकर क्षेत्रातील भाजीपाला पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

River-stream flows in the Naigaon Valley | नायगाव खोऱ्यातील नदी-नाले प्रवाहित

सिन्नर तालुक्यातील नायगाव परिसरातील शेतामध्ये शिरलेले पावसाचे पाणी.

Next
ठळक मुद्देमहादेवाचे मंदिर पुराच्या पाण्याने वेढले आहे.

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे नायगाव खोºयातील सर्व नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. नायगाव- सायखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शेतात पाणी साचल्याने हजारो एकर क्षेत्रातील भाजीपाला पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
रविवारी (दि.४) पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव खोºयातील सर्वच छोटे-मोठे नदी-नाले दुपारपासून ओसंडून वाहू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या सततच्या पावसामुळे शेतातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज पडत असलेल्या संततधार पावसाने व पहाटेपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे नायगाव खोºयातील सर्वच नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गेल्या चार वर्षांनंतर पहिल्यांदाच परिसरातील सर्व बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
गत चार वर्षांनंतर नायगाव खोºयातील नद्या रविवारच्या कोसळधार पावसामुळे वाहत्या झाल्या आहेत. पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे शेतात असलेले खरिपातील कोबी, टमाटे, मिरची, मका, मेथी, कोथिंबीर, शेपू, मेथी आदी भाजीपाल्यासह पेरणी केलेले सोयाबीन , भुईमूग, बाजरी आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले
आहे.
दरम्यान, गोदावरी व दारणेला आलेल्या महापुराचे पाणी जोगलटेंभी येथील संगमावर एकत्र आल्याने महादेवाचे मंदिर पुराच्या पाण्याने वेढले आहे. जोगलटेंभी येथील उसाचे क्षेत्र पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती सरपंच शशिकांत पाटील व लक्ष्मण भास्कर यांनी दिली. याच दोन्ही नद्यांचे पाणी निफाड तालुक्यातील सावळी गावाजवळील नायगाव -सायखेडा रस्त्यावर आल्याने हा रस्ता शनिवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे. परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.पूर पाहण्यासाठी गर्दीगेल्या अनेक वर्षांनंतर रविवारी नायगाव खोºयातील नद्या पावसामुळे ओसंडून वाहत्या झाल्या आहेत. पंधरा दिवसांपासून पडणाºया पावसामुळे शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी अनेक दिवसांनी परिसरातील सर्व बंधारे तुडुंब भरून नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: River-stream flows in the Naigaon Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस