दिंडोरी तालुक्यातील नद्या डिसेंबरमध्येच कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 06:18 PM2020-12-22T18:18:51+5:302020-12-22T18:19:54+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते; परंतु धरणाच्या तालुक्यातील नद्या यंदा डिसेंबरपासूनच कोरड्या झाल्या असल्याने भविष्यात पाण्याचे नियोजन काय, असा सवाल जनतेसमोर उभा राहिला आहे. दिंडोरी तालुक्यात करजंवण, वाघाड, पालखेड बंधारा, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव आदी मोठी धरणे असून काही छोटी धरणेही या तालुक्यात आहेत.

Rivers in Dindori taluka dry up in December | दिंडोरी तालुक्यातील नद्या डिसेंबरमध्येच कोरड्या

दिंडोरी तालुक्यातील नद्या डिसेंबरमध्येच कोरड्या

googlenewsNext
ठळक मुद्देभविष्यात पाणी टंचाईची शक्यता : नागरिकांमध्ये भीती व्यक्त

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते; परंतु धरणाच्या तालुक्यातील नद्या यंदा डिसेंबरपासूनच कोरड्या झाल्या असल्याने भविष्यात पाण्याचे नियोजन काय, असा सवाल जनतेसमोर उभा राहिला आहे.
दिंडोरी तालुक्यात करजंवण, वाघाड, पालखेड बंधारा, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव आदी मोठी धरणे असून काही छोटी धरणेही या तालुक्यात आहेत.

दिंडोरी तालुक्यातील या धरणांतून निफाड, येवला, मनमाड तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी रोटेशन पध्दतीने पाणी पुरवठा केला जातो; परंतु मागील वर्षी या काळात खळखळून वाहणाऱ्या नद्यांनी मात्र यंदा डिसेंबरमध्येच तळ गाठल्याने भविष्यात चिंतेचा विषय ठरू पाहत आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत कधीही डिसेंबर महिन्यात कादवेचे पात्र कोरडे पडले नव्हते. यंदा प्रथमच कादवा नदी कोरडी झाली आहे. त्यामुळे तर्कविर्तक काढले जात आहे.

तालुक्यातील करजंवण धरण क्षेत्रात मागील वर्षी १,२४४ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे साधारणपणे ऑगस्ट महिन्यापर्यंत करजंवण धरण १०० टक्के भरलेले होते. त्याच्या उलट यंदाची स्थिती आहे. यावर्षी करजंवण धरण कार्यक्षेत्रात ८९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात ३५४ मिलीमीटर पाऊस कमी पडला आहे. करजंवण धरण सध्याच्या स्थितीत ९३ टक्के भरलेले आहे.

मागील वर्षी दिंडोरी तालुक्यात साधारणपणे १,६८६.९० मिलिमीटर पाऊस झाला होता. तर चालू वर्षी ९९१.४५ इतका पाऊस झाला आहे. काही जुन्या जाणकार अभ्यासकांच्या मतानुसार यंदा चार वर्षाच्या तुलनेत दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 

Web Title: Rivers in Dindori taluka dry up in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.