पांगरी येथे वीजप्रश्नी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:29+5:302021-02-14T04:14:29+5:30
पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी येथे वीज वितरण कंपनीच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेबद्दल तीव्र ...
पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी येथे वीज वितरण कंपनीच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कृषी धोरणाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून सक्तीचे वीज बिल वसुली करण्यात येत असल्याच्या धोरणाचा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी निषेध केला.
छावा संघटनेच्या या आंदोलनात सिन्नर प्रहार जनशक्ती पक्षही सहभागी झाला होता. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज बिल वसुलीचा तीव्र शब्दात निषेध केला. सकाळी शेतकऱ्यांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिन्नर-शिर्डी रस्त्यावर ठाण मांडून रोष व्यक्त केला.
छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी शासनाच्या वीज धोरणावर टीकास्त्र सोडले. शेतकरी अडचणीत आहे. वीज रोहित्र जळालेले आहे. शासनाच्या या धोरणा विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा पांगारकर यांनी दिला. आम्ही वीज वापरलीच नाही तिचे बिल कसे भरायचे, असा सवाल शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे यांनी उपस्थित केला. वीज वितरण कंपनीने कोणाचाही वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी वावी वीज उपकेंद्राचे शाखा अभियंता अजय साळवे, दापूरचे पंकज चौधरी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वीज रोहित्राचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आत्माराम पगार, रभाजी पगार, संपत पगार, नितीन पांगारकर, दिलीप पगार, स्मिता निकम, मंदा रोकडे
अरुण पांगारकर, ज्ञानेश्वर पांगारकर, दौलत धनगर, शत्रुघ्न झोंबाड, संदीप लोंढे, गणेश जाधव, अर्जुन घोरपडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
------------
वाहनांच्या रांगा
रास्ता रोको आंदोलन सुमारे अर्धा तास चालल्याने गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी प्रहार संघटना अध्यक्ष शरद शिंदे, ज्ञानेश्वर पांगारकर सुभाष पगार यांची भाषणे झाली. वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सागर कोते यांच्यासह वावी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
---------------
पांगरी येथे सक्तीच्या वीज बिल वसुलीविरोधात छावा संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात बोलताना छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर व आंदोलनात सहभागी झालेले छावा संघटनेचे कार्यकर्ते. (१३ पांगरी)
===Photopath===
130221\13nsk_18_13022021_13.jpg
===Caption===
१३ पांगरी