पेठ येथे महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 04:29 PM2020-09-10T16:29:13+5:302020-09-10T16:31:25+5:30
पेठ- गुजरात राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था, वाढीव लाईट बील, आरोग्य सुविधा, आठवडे बाजार सुरु करावेत आदी मागण्यांसाठी पेठ येथे महाविकास आधाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पेठ- गुजरात राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था, वाढीव लाईट बील, आरोग्य सुविधा, आठवडे बाजार सुरु करावेत आदी मागण्यांसाठी पेठ येथे महाविकास आधाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेचे तालुकाप्रमूख भास्कर गावीत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.१०)सकाळी येथील जूने बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.एकच वर्षात नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून या कामाची चौकशी व्हावी, लॉक डाऊन काळात बंद असलेल्या व्यावसायिकांना मोठया प्रमाणात आलेले वीजबिल सुट करावे, तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करावेत यासह आरोग्य, रस्ते, दळणवळण आदी मागण्यांचे तहसीलदार संदिप भोसले यांना निवेदन देण्यात आले. जवळपास दोन तासाच्या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पेठ पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदशर्नाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी जि.प. सदस्य तथा सेनेचे तालुकाध्यक्ष भास्कर गावित , नगराध्यक्ष मनोज घोंगे , सभापती विलास अलबाड, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे,पं.स. सदस्य तुळशीराम वाघमारे , कॉग्रेस तालुकाध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष याकूब शेख, मोहन कामडी, किरण भूसारे, नगरसेवक संतोष डोमे, राधाबाई राऊत, चेतन निखळ , गटनेते भागवत पाटील , पुंडलीक महाले ,पदमाकर कामडी , गणेश शिरसाठ , नगरसेविका लता सातपूते, लिलाबाई निकम , शहरप्रमुख शितल राहणे, रमेश दरोडे, जगदिश गावीत यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.