मालेगावी मराठा आरक्षणासाठी सोयगाव चौफुलीवर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:01+5:302021-07-10T04:11:01+5:30
या आंदोलनाचे नेतृत्व छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. ...
या आंदोलनाचे नेतृत्व छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यास राज्य शासनाने प्रभावीपणे न केलेला युक्तिवाद कारणीभूत ठरला आहे. समाजाची वस्तुनिष्ठ बाजूच न्यायालयासमोर आली नाही, यातून शासनाची कुटिल भूमिका स्पष्ट होते; परंतु आता मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. मराठा आरक्षण, शेतकर्यांना विमा संरक्षण अन् पिकांना हमीभाव या मागण्या मान्य झाल्याखेरीज माघार घेणार नाही, अशी भूमिका छावाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली. शासनाच्या मराठा आरक्षण धोरणाविरोधात टीका करण्यात आली. तत्पूर्वी जावळे यांच्या उपस्थितीत शहरातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी फेरी काढण्यात आली. महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर टेहरे- सोयगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष जीवन हिरे, कारभारी शेवाळे, केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण तनपुरे, तालुकाध्यक्ष किशोर गांगुर्डे, महेंद्र हिरे, दिनेश अहिरे, प्रशांत जाधव, किरण निकम, राजू पाटील, बापू पवार, बापू गांजे, राकेश देवरे, आशिष निकम आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो - ०९ मालेगाव रास्ता रोको
टेहरे - सोयगाव चौफुलीवर निदर्शने व रास्ता रोको करताना नानासाहेब जावळे-पाटील, जीवन हिरे, कारभारी शेवाळे, भीमराव मराठे, विजयकुमार घाडगे पाटील, पंजाबराव काळे पाटील, प्रवीण तनपुरे, किशोर गांगुर्डे, महेंद्र हिरे, दिनेश अहिरे, प्रशांत जाधव, किरण निकम आदींसह कार्यकर्ते.
090721\09nsk_4_09072021_13.jpg
टेहरे - सोयगाव चौफुली वर निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करतांना नानासाहेब जावळे-पाटील, जीवन हिरे, कारभारी शेवाळे, भीमराव मराठे, विजयकुमार घाडगे पाटील, पंजाबराव काळे पाटील, प्रविण तनपुरे, किशोर गांगुर्डे, महेंद्र हिरे, दिनेश अहिरे, प्रशांत जाधव, किरण निकम आदींसह कार्यकर्ते.