शेतकरी, कामगारांनी रोखला रस्ता; नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर तासभर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:37 PM2020-11-26T13:37:59+5:302020-11-26T13:39:53+5:30

नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतुक सातपूरकडून गिरणारेमार्गे वळविण्यात आली होती. तसेच नाशिककडे येणारी वाहतुक त्र्यंबकरोडवरून पहिने-पेगलवाडीजवळून रोहिलेमार्गे रवाना करण्यात आली.

Road blocked by farmers, workers; Stay on Nashik-Trimbakeshwar road for an hour | शेतकरी, कामगारांनी रोखला रस्ता; नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर तासभर ठिय्या

शेतकरी, कामगारांनी रोखला रस्ता; नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर तासभर ठिय्या

Next
ठळक मुद्देवाहतुक ठप्पवाट अडवून जोरदार घोषणाबाजी

नाशिक : केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी कायदे, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे, गरजु कुटुंबाला सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत द्यावे, कोरोनापासून सुटका करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करावी विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नाशिक तालुका कमिटी, अखिल भारतीय किसान सभेने एल्गार पुकारला. गुरुवारी (दि.२६) लाल बावटे घेत शेतकरी, कामगार घटकातील आंदोलकांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता दुतर्फा रोखून धरला.

भाजपा सरकारच्या शेतकरी-कामगारविरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी रास्ता रोकोची हाक देण्यात आली होती. कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने पुकारलेल्या या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद लाभला. केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करत आंदोलकांनी महिरावणी गावाजवळील चौफुलीवर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रास्ता रोको सुरु केला. त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या दुतर्फा आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे नाशिक-त्र्यंबक-नाशिक या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतुक सातपूरकडून गिरणारेमार्गे वळविण्यात आली होती. तसेच नाशिककडे येणारी वाहतुक त्र्यंबकरोडवरून पहिने-पेगलवाडीजवळून रोहिलेमार्गे रवाना करण्यात आली. सुमारे तासभर आंदोलकांनी वाट अडवून जोरदार घोषणाबाजी केली. तासाभरानंतर पोलिसांनी मात्र आंदोलकांना त्वरित हटविण्यास सुरुवात करत वाहतूक सुरळीत केली.

...अशा आहेत मागण्या
वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा.
औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणींना ८० टक्के प्राधान्य द्या.
लॉकडाऊन काळातील वीजबीले पुर्णपणे माफ करा.
दारिद्य्ररेषेखालील प्रत्येक कुटुंबाला केसरी कार्डऐवजी पिवळे रेशनकार्ड द्या.
ऑनलाइन शिक्षणपध्दती बंद करा.
प्रस्तावित जनविरोधी प्रकल्प रद्द करा
 

Web Title: Road blocked by farmers, workers; Stay on Nashik-Trimbakeshwar road for an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.