ताहाराबाद मोसम नदीवरील पुलाचे रस्ता काम उखडले

By admin | Published: October 31, 2014 10:58 PM2014-10-31T22:58:25+5:302014-10-31T22:58:37+5:30

ताहाराबाद मोसम नदीवरील पुलाचे रस्ता काम उखडले

The road to the bridge on the river Taoharad Mohej was broken | ताहाराबाद मोसम नदीवरील पुलाचे रस्ता काम उखडले

ताहाराबाद मोसम नदीवरील पुलाचे रस्ता काम उखडले

Next

ताहाराबाद : येथील मोसम नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामाचे आठवड्याभरापूर्वीच नूतनीकरण करण्यात आले. मात्र सदर काम कमी दर्जाचे झाले असल्याकारणाने हा रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे या पुलावरून ये - जा करताना वाहनाना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर उखडला गेलेला रस्ता नीट लक्षात येत नसल्यामुळे वाहनधारकांची विशेषत: दुचाकीधारकांची ऐनवेळेस मोठी तारांबळ उडते. परिणामी छोटे - मोठे अपघात येथे घडत आहेत. त्यामुळे संबंधित उखडलेल्या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक व येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Web Title: The road to the bridge on the river Taoharad Mohej was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.