इगतपुरी तालुक्यात रस्ते,पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 02:46 PM2019-07-27T14:46:59+5:302019-07-27T14:47:09+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यात संततधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे. आज २१२ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १९७५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

Road, bridge under water in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात रस्ते,पूल पाण्याखाली

इगतपुरी तालुक्यात रस्ते,पूल पाण्याखाली

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यात संततधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे. आज २१२ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १९७५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. भावली धरण १०० टक्के भरले आहे. दारणा धरणात ८५.०९ पाणी साठले असून ८९.१८ घनमीटर पाणी प्रती सेकंद वेगाने सोडण्यात आले आहे. घोटी सिन्नर महामार्गावरील धोकादायक समजल्या जाणार्या देवळे येथील पुलाखालून वेगाने पाणी वाहत असून ह्या पुलावर पाणी आल्यास महामार्ग ठप्प होऊ शकतो. तालुक्याच्या सर्व भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. पुलांवरून रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे. खिरपाच्या कामांना वेग आला असला तरी पावसाने नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. पावसाच्या परिस्थितीवर तालुका प्रशासनाचे लक्ष असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्कता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे यांनी कळवले आहे. कालपासून सुरू असलेला पाऊस काही मिनिटांकरिता विश्रांती घेऊन पुन्हा पुन्हा कोसळत आहे. अस्वली ते मुंढेगावला जोडणार्या ओंडओहोळ पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सुरिक्षतता म्हणून ह्या भागातील वाहतूक थांबवण्यात आली असल्याचे सहाय्यक अभियंता कौस्तुभ पवार यांनी सांगितले. वैतरणा भागाकडे घोटीतून जाणार्या बर्याच रस्त्यांवर पाणी वाहत आहे. घोटी सिन्नर महामार्गावर पावसामुळे आधीच खड्डेमय असणारा रस्ता जास्त खड्ड्यांनी वेढला आहे. खड्डे चुकवतांना वाहन धारकांकडून अपघात वाढले आहेत. पावसामुळे ह्यात मोठ्या प्रमाणात धोका वाढला आहे.

Web Title: Road, bridge under water in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक