इगतपुरी तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:09 AM2018-04-19T00:09:26+5:302018-04-19T00:09:26+5:30
इगतपुरी : तालुक्यातील अनेक रस्त्यांची परिस्थिती भूषणावह नक्कीच नाही. अतिवृष्टीने रस्ते खराब झाले आहेत. राज्य महामार्गापासून वाडीवºहेला जोडणारा रस्ता प्रवशांसह वाहनधारकांना डोकेदुखी व अपघाताला कारण होत आहे. वाडीवºहे ते मुरंबी, मोडाळे, आहुर्ली, शेवगेडांग हा रस्ता अवघ्या चार महिन्यात उखडून गेला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे देखील बुजविले नाहीत. दीड महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घोटी बाजार समितीचे उपसभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी केली आहे.

याबाबत आमदार जयंत जाधव, उदय सांगळे व माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. वरील काम पावसाळा सुरू होण्यापुर्वी लवकरात लवकर सुरू करावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाºयांना सूचनादेखील केल्या.
वाडीवºहे ते सांजेगाव या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली असल्याने संबंधित रस्त्याचे काम चालू करण्यात यावे. तसेच बंभाळे फाटा ते कुशेगाव या रस्त्यासाठी १ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे टेंडरदेखील प्रसिद्ध झाले असून, टेंडर मुदत संपल्यानंतर रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदनाद्वारे सदस्य गोरख बोडके यांनी केली आहे.