येवला पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:50 PM2019-07-08T17:50:37+5:302019-07-08T17:51:02+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.

Road closures in Yeola West area have been severe | येवला पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट

येवला पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट

Next
ठळक मुद्देजळगाव नेऊर -जऊळके रस्त्यावर प्रवास करणे झाले अवघड

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. असा प्रश्न या परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. या रस्त्यावरु न दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. रस्त्यांवर मोठ-मोठे पडलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना, शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते.
या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात. तसेच या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी विद्यार्थीनी जळगाव नेऊर याठिकाणी ये जा करतात, सायकल हि व्यवस्थित चालवता येत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताला आमंत्रण मिळत आहे. तसेच खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच मागील पावसाळ्यामध्ये मुखेड फाटा ते जऊळके रस्त्याची ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मुरु म टाकून डागडुजी केली होती, परंतु आता रस्त्याची दयनीय आवस्था झाली असुन लोकवर्गणीतून काढून किती दिवस रस्ता दुरु स्त करायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तसेच जळगाव नेऊर ते जऊळके हा लासलगावला जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग असल्याने या रस्त्यावरु न शेकडो वाहन धारक प्रवास करतात परंतु रस्त्याची आवस्था खराब झाल्याने वाहन धारकांना विंचूर मार्गे प्रवास लागत आहे.
खराब रस्त्यामुळे पाठीचे व मणक्याचे आजार जडत असून अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रि या.....
जळगाव नेऊर ते जऊळके या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी जळगाव नेऊर येथे शिक्षणासाठी ये जा करतात, तसेच ग्रामस्थांचे सर्व बँकांचे आर्थिक व्यवहार जळगाव नेऊर येथे असतात, त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालु असते , तेव्हा लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा.
- भाऊराव जाधव,
ग्रामपंचायत सदस्य, जऊळके.


(फोटो ०८ रस्ता नेऊर)
जळगाव नेऊर -जऊळके रस्त्याची झालेली दयनीय अवस्था .

Web Title: Road closures in Yeola West area have been severe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.