साठ लाख खर्चून केलेल्या रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:20+5:302021-05-08T04:15:20+5:30
या रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता पावसाळ्यात संपूर्णपणे वाहून जाईल व यावर वापरण्यात आलेला ६० लाख रुपयांचा निधीही ...
या रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता पावसाळ्यात संपूर्णपणे वाहून जाईल व यावर वापरण्यात आलेला ६० लाख रुपयांचा निधीही वाया जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत रस्त्याची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदाराचे बिल थांबवण्यात यावे तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
६० लाख रुपये किमतीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम एका महिन्यातच उखडले गेले असून, या रस्त्याच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची नागरिकांची मागणी होती. कोरोनाकाळात जवळपास ६० लाख रुपये खर्च करून हा रस्ता बनविण्यात आला. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने हा रस्ता नगरपरिषदेला २७ मार्च २०२१ रोजी हस्तांतरित केला. पण अवघ्या एक महिन्याचा अवधी उलटला नाही तोच सदर रस्त्याला खड्डे पडले असून, हा रस्ता उखडला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्याची उंची रस्त्यापेक्षा जास्त असल्याने पावसाचे पाणी कॉलनीत शिरत आहे. सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली आहे.
कोट...
एकच महिन्यापूर्वी बांधलेल्या साठ लाखाच्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्याला अवकाळी पावसाने खड्डे पडले आहेत. खडी उखडल्याने यापुढे सतत चालणाऱ्या चार महिने पावसात या रस्त्याची काय अवस्था होईल, याची चिंता वाटते.
-- दि.ना. उघाडे, अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी सेना.
फोटो- ०७ इगतपुरी रोड
महिंद्रा कॉलनी समोरील रस्त्याला पडलेले खड्डे.
===Photopath===
070521\07nsk_30_07052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०७ इगतपुरी रोड महिंद्रा कॉलनी समोरील रस्त्याला पडलेले खड्डे