पिंपळगाव मोर ते वासाळी रस्त्याची दुदर्शा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:38 PM2020-08-19T16:38:20+5:302020-08-19T16:39:16+5:30
घोटी : भंडारदरा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असतानाही या मार्गावरील पिंपळगाव मोर ते वासाळी दरम्यानचा रस्ता उध्वस्त झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती जयाताई कचरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कायर्कारी अधिकारी लीना बनसोड यांची इगतपुरी दौऱ्यात भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.

नाशिक - नगर मार्गावर असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्यालगत असलेल्या पिंपळगाव मोर वासाळी दरम्यानच्या पर्यटक व भाविकांचे लक्षस्थान असलेल्या या मार्गावर रस्त्याला मोठेमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरुन वाहन चालविणे हे वाहनचालकांसाठी कसरतीचे ठरत आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान तर होतेच परंतु अनेक लहानमोठ्या अपघातांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडेच बांधकाम विभागाच्या अधिका?्यांचे दुर्लक्ष का? असा सवालही सभापती जया रंगनाथ कचरे यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कायर्कारी अधिकारी लीना बनसोड व जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या इगतपुरी दौºयात सभापती जया कचरे यांनी भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. यावेळी समाजकल्याण सभापती सुशीला मेंगाळ, उपसभापती जिजाबाई नाठे, रघुनाथ तोकडे, माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, सदस्य सोमनाथ जोशी कार्यकर्ते रंगनाथ कचरे आदी उपस्थित होते.