येवला पश्चिम भागातील रस्त्यांच्या अवस्था बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 06:30 PM2019-12-26T18:30:38+5:302019-12-26T18:31:12+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे.

The road conditions in the west of Yeola are getting worse | येवला पश्चिम भागातील रस्त्यांच्या अवस्था बिकट

जऊळके ते मुखेड फाटा रस्त्याची झालेली दुरवस्था

Next
ठळक मुद्देजळगाव नेऊर -जऊळके रस्त्यावर प्रवास करणे अवघड

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे.
जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके, जळगाव नेऊर ते पिंपळगाव लेप, जऊळके ते देशमाने या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून या रस्त्याला कोणी वाली आहे का? असा प्रश्न या परिसरातील नागरिक, शेतकरी उपस्थित करत आहेत.
या रस्त्यावरु न दररोज मोठ्याया प्रमाणात वाहतुक होत असते. रस्त्यांवर मोठ-मोठे पडलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना, शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते.
या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात. रस्त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. विशेष म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांची जास्त हाल होत आहेत.
मुखेड फाटा ते जऊळके रस्त्याची ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून मुरु म टाकून डागडुजी केली होती. परंतु आता परत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असुन लोकवर्गणीतून किती दिवस रस्ता दुरु स्त करायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. चौकट....
जळगाव नेऊर ते जऊळके हा लासलगावला जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग असल्याने या रस्त्यावरु न शेकडो वाहन धारक प्रवास करतात परंतु रस्त्याची आवस्था खराब झाल्याने वाहन धारकांना विंचूर मार्गे प्रवास लागत आहे. खराब रस्त्यामुळे पाठीचे व मनक्याचे आजार जडत असून अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करण्यात यावी. अन्यथा या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये वृक्षारोपण करु न गांधीगिरी स्वरु पाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

येवल्याच्या पश्चिम ग्रामीण भागातील डांबरीकरण झालेल्या बरेचशा रस्त्यांचे डांबर निघाल्याने खडीकरणासारखे खड्डेमय रस्ते झाले असुन रस्त्याने प्रवास करतांना मोठी कसरत करावी लागते.गेल्या पाच वर्षात कोणत्याही प्रकारची रस्त्यांची डागडुजी झालेली नाही खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक अपघात देखील झालेले आहेत. जऊळके ते जळगाव नेऊर या रस्त्यावरु न शेकडो विद्यार्थी ये जा करत असतात त्यामुळे त्वरीतरस्ता दूरु स्त करावा.
- दिनकर शिंदे. जळगाव नेऊर.

Web Title: The road conditions in the west of Yeola are getting worse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.