त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्याची चाळण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 09:04 PM2020-09-09T21:04:16+5:302020-09-10T01:12:12+5:30

त्र्यंबकेश्वर : शहरात प्रवेश करताना श्रीगजानन महाराज चौकात सुरु असलेले काम तसेच त्र्यंबकेश्वर महाविद्यालय ग्रामदेवता महादेवी पोलीस स्टेशन या ठिकाणांना जोडणारा जव्हार फाटा (लिंकरोड) रस्त्याची अद्या अक्षरश: चाळण झाली आहे. अनेकांची खड्यात आदळून वाहने अन् तब्बेतही खिळखिळी झाली आहे.

Road culvert entering Trimbakeshwar city! | त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्याची चाळण !

त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्याची चाळण !

Next
ठळक मुद्देगावातील वाहने माल वाहतुकीचे ट्रक मुख्य रस्त्याने येऊ लागले.

लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : शहरात प्रवेश करताना श्रीगजानन महाराज चौकात सुरु असलेले काम तसेच त्र्यंबकेश्वर महाविद्यालय ग्रामदेवता महादेवी पोलीस स्टेशन या ठिकाणांना जोडणारा जव्हार फाटा (लिंकरोड) रस्त्याची अद्या अक्षरश: चाळण झाली आहे. अनेकांची खड्यात आदळून वाहने अन् तब्बेतही खिळखिळी झाली आहे.
गेल्या पाच सहा महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदीर बंद केल्यापासुन श्री गजानन महाराज चौकातुन शहरात प्रवेश करणारा मुख्य रस्ता बॅरिकेट्स लाउन बंद केल्याने जव्हार लिंक रोड मार्गे त्र्यंबकेश्वर महाविद्यालय या रस्त्याने शहरात प्रवेश करावा लागतो. तसे पाहता या रस्त्याने पुर्वी फक्त शेतकरी आपल्या शेताकडे जात असत. गायी म्हशी आदी गुरांचे कळपही याच रस्त्याने जात असत. अगदी तुरळक प्रमाणात मोटार वाहतुक देखील चालत असे.
सन २००३/४ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात जवळपास १५ ते १६ फुट ५ (मीटर) रुंद रस्ता तयार करण्यात आला. दरम्यान याच रस्त्त्याने पुढे आल्यावर उजवीकडे वाहनतळ करण्यात आला आहे. साहजिकच गजानन महाराज चौकातुन सर्व वाहने याच रस्त्याने पार्किंगकडे वळविण्यात आली. गावातील वाहने माल वाहतुकीचे ट्रक मुख्य रस्त्याने येऊ लागले. तथापि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच सहा महिन्यांपासुन हा रस्ता वाहतुकीस प्रवाशी वाहतुक वगैरेंसाठी पुर्ण पणे बंद करण्यात आला आहे.
आता या ठिकाणी चौक विस्तारीकरणाचेही काम चालु असल्याने वाहने येण्या जाण्याचा मार्ग स्या बंद आहे. या रस्त्यावर देखील खड्डे पडलेले आहेत. सध्या श्रीगजानन महाराज चौक विस्तारीकरणाचे काम चालु आहे. त्याच कामात रस्त्यावरील खड्डे देखिल बुजवावेत अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. (फोटो ०९ टीबीके, १)

Web Title: Road culvert entering Trimbakeshwar city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.