देवळाली कॅम्पमधील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:50 AM2019-07-23T00:50:32+5:302019-07-23T00:50:49+5:30
देवळाली कॅम्प येथील जुनी स्टेशनवाडी झोपडपट्टीतील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे चार महिने चिखलातून जावे लागत आहे.
भगूर : देवळाली कॅम्प येथील जुनी स्टेशनवाडी झोपडपट्टीतील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे चार महिने चिखलातून जावे लागत आहे. देवळाली रेल्वे स्टेशनच्या बाजूला जुनी स्टेशनवाडी म्हणून ८० वर्षांपूर्वीची मोठी झोपडपट्टी आहे. येथे कुठेही
काँक्रिटीकरण केलेले रस्ते नाहीत, ठरावीक कुटुंबात स्वत:चे पिण्याच्या पाण्यासाठी नळकनेक्शन आहे, तर काहींनी शौचालय बांधून घेतले आहे. अनेक गरीब कुटुंबांना इतरत्र पाणी भरण्यासाठी जावे लागते, तर बरेच नागरिक बाजूला जंगलात शौचास जातात.
या परिसरात आता कुठेतरी रस्त्याच्या खड्ड्यात मुरूम टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक गरीब नागरिक चिखलमातीत राहून जीवन जगत आहेत. तरी यांना दळणवळणासाठी रेल्वेच्या मोरीखालून एकच रस्ता असून तो रेल्वे क्वॉर्टर बाजूने मातीखडीचा आहे. त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रात्रीच्या अंधारात मोठा त्रास होऊन अपघात होत असून, कुणीही वाली नाही. तसेच देवळाली छावणी परिषदेच्या अखत्यारित हा प्रभाव असून, येथे उर्वरित भागात मनपाचा प्रभाग आहे. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्याने अत्यावश्यक सुविधा नाहीत. तसेच ही झोपडपट्टी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डासह काही रेल्वेच्या भागात आणि खासगी जागेवर वसलेली असल्याने कुठल्याही शासकीय सुविधा मिळत नाही.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने निदान मुरूम टाकून चांगले रस्ते अत्यावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी येथील रहिवासी बाळासाहेब दोंदे, राजेश कांबळे, जयवंत जाधव, विलास बोराडे, सोपान गवारे, विक्र म पवार, बाळाराम दोंदे, अनिल गारु डी, बबन पगार यांनी केली आहे.
पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही
जुनी स्टेशनवाडी म्हणून ८० वर्षे पूर्वीची मोठी झोपडपट्टी आहे. येथे कुठेही
काँक्र ीटचे रस्ते नाही, ठरावीक कुटुंबात स्वत:चे पिण्याच्या पाण्यासाठी नळकनेक्शन आहे, तर काहींनी शौचालय बांधून घेतले आहे. अनेक गरीब कुटुंबांना इतरत्र पाणी भरण्यासाठी जावे लागते.