रस्ता सुरक्षेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By admin | Published: January 16, 2016 11:00 PM2016-01-16T23:00:23+5:302016-01-16T23:01:56+5:30
मनमाड : राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम
मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालयात प्रादेशिक परिवहन विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून परिवहन अधिकारी अनिल कदम, उपप्राचार्य डी.जी. जाधव हे व्यासपीठावर उपस्थित
होते.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. रस्ता सुरक्षा या विषयावर परिवहन अधिकारी कदम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. गाडी वाहन परवाना, गाडीची कागदपत्रे नेहमी सोबत बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य जाधव यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीविषयीच्या स्वयंशिस्तीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. आंबेकर, प्रा. के. एस. काखंडकी, एस. डी. मोहन यांनी केले. विद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)