जव्हार फाटा ते वेळुंजे रस्त्याला खडीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:18 AM2021-08-27T04:18:53+5:302021-08-27T04:18:53+5:30
दर दोन-चार वर्षांनी हा रस्ता खराब होत असतो. मग पुन्हा नवीन टेंडर, नवीन रस्ते, पुन्हा दोन-चार वर्षांत हीच परिस्थिती. ...
दर दोन-चार वर्षांनी हा रस्ता खराब होत असतो. मग पुन्हा नवीन टेंडर, नवीन रस्ते, पुन्हा दोन-चार वर्षांत हीच परिस्थिती. त्यापेक्षा हा रस्ता सिमेंट काँक्रीटमध्ये करावा, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
या आठ किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हरसुल भागातून तालुक्याला जोडणारा एकमेव पर्यायी रस्ता आहे. जेमतेम दहा किमी अंतर पार करताना वाहनधारकास तारेवरची कसरत करावी लागते आहे.
ऐन पावसाळ्यात खड्डे न भरल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता, आता रस्ते भरण्याचे काम चालू आहे; परंतु वरचेवर मोठे खड्डे भरून कामात चालढकल चालू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तसेच भोंगळ कारभारामुळे ठेकेदार मनमानी करतात, त्यामुळेच निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात. त्याचा फटका प्रवाशांना बसताना दिसतो. ह्या रस्त्याने दूध व्यावसायिक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात; पण खड्ड्यांमुळे दूध त्यांना मोठा फटका बसत आहे.
कोट...
अंबोली फाटा ते वेळुंजे रस्ता अतिशय खराब झाला आहे. प्रवाशांना रस्त्यातून मार्ग काढणे जिकिरीचे बनते आहे. काही वेळा दुचाकीस्वरांचे अपघातही होत असतात, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची झालेली दुरवस्था थांबवावी व ठेकेदारांना पाठीशी न घालता चांगल्या प्रतीचे रस्ते लवकरात लवकर बनवून घ्यावेत.
- संजय मेढे, शिवसेना उपतालुका प्रमुख.
वारंवार हा रस्ता खराब होत असतो दोन-चार वर्षे झाली का पुन्हा काम निघत असते. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे अपघात होत आहे. याला जबादार कोण? हरसुल भागातून तालुक्याच्या ठिकाणी जायचे म्हटले तर हरसुलवरून जायला चार तास लागतात. लोकांना नाहक मनस्ताप करावा लागतो, त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता नीट केला जावा.
- रूपांजली माळेकर, जि. प. सदस्य, हरसुल गट
सदरील रस्ते हे सिमेंट काँक्रिटीकरण झाले पाहिजे, अशी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही मागणी करीत आहोत. अतिशय दयनीय अवस्था या रस्त्यांची पाहायला मिळेल, रस्ता दुरुस्त केल्यानंतर तो काही महिन्यांतच लगेच खराब होत असेल तर कामाचा दर्जा सुधारणे किंवा या मार्गावरील रस्ते सिमेंटचे बनवावेत.
- उमेश सोनवणे, तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.
260821\img_20210826_101836.jpg
फोटो:- १खडे भरण्यासाठी वापरली जाणारी खडी